सामाजिक

धक्कादायक – धामणी (ता.आंबेगाव) येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला !!

img 20260403 wa0443

प्रा.अरुण गोरडे – धामणी (ता.आंबेगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे.गावातील तरुण अक्षय फकीरा विधाटे ( वय : २८ वर्षे ) याच्यावर लोणी-धामणी रस्त्याने लोणी वरून धामणी कडे येत असताना बिबट्याने गुरुवार ( दि.०२) रात्री साधारण आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक हल्ला केला.या हल्ल्यात अक्षय याच्या उजव्या पायाला बिबट्याच्या पंज्याने गंभीर जखम झाली आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र,धामणी येथे दाखल केले.तेथून वनविभागाचे अधिकारी नीलम चव्हाण यांना संपर्क साधून त्यांनी वनकर्मचारी वाघ मामा यांनी तातडीने पुढील उपचारासाठी मंचर ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी आहे.

दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, असे आव्हान सरपंच अक्षयराजे शिवाजी विधाटे यांनी केली
आहे.

बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी मा.सरपंच सागर जाधव यांनी केली आहे.

fb img 1773887068819

Related posts

महाराष्ट्र मंडळाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे स्केटिंग स्पर्धाचे आयोजन !!

Chief Editor

शिंगवे येथे दर पौर्णिमेला भैरवनाथ पालखी सोहळा ; वारकरी विद्यार्थ्यांचा सहभाग; ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत !!

Chief Editor

Chief Editor

Leave a Comment