सामाजिक

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून समुदाय सहभाग प्रकल्पाचे सादरीकरण !!

1011459045
1011459045

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी समर्थ गुरुकुल येथे (CEP) समुदाय सहभाग प्रकल्प अंतर्गत विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले.

या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती, महिला सक्षमीकरण,सौर ऊर्जा, पाणी बचत आणि वृक्षारोपण अशा विविध सामाजिक व पर्यावरणपूरक विषयांवर प्रकल्प तयार केले. विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांच्या माध्यमातून गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना संबंधित विषयांची माहिती देऊन त्यांचे महत्त्व, फायदे आणि दैनंदिन जीवनातील उपयोग समजावून सांगितले.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्थानिक समुदायाच्या गरजा, समस्या आणि आव्हाने समजून घेऊन त्यावर उपयुक्त उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. अभियांत्रिकीतील तांत्रिक ज्ञान व कौशल्यांचा उपयोग समाजोपयोगी उपक्रमांसाठी करणे, महाविद्यालय आणि समाज यांच्यात सहकार्याचे नाते निर्माण करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संघभावना आणि समस्या निराकरण कौशल्ये विकसित करणे ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.या उपक्रमातून ‘तंत्रज्ञानातून समाजसेवा आणि शिक्षणातून सामाजिक परिवर्तन’ हा संदेश देण्यात आला.

या उपक्रमाबद्दल समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके आणि कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, क्रीडा संचालक एच.पी. नरसुडे यांनी आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. प्रकल्प समन्वयक प्रा. प्रियांका पोटफाडे, प्रा. प्रियांका लोखंडे, प्रा. सुचिता साबळे, प्रा. दीपाली गाडगे आणि प्रा. श्रुती करपे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
1011423306

Related posts

चांडोली बुद्रुक केंद्रातील ७२ शिक्षकांची कळंब येथे शिक्षण परिषद संपन्न !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे ) येथील चिचगाई स्मशानभूमी परिसर सुधारणा भूमिपूजन संपन्न !!

Chief Editor

वारकरी सेवेतून मानवतेचा वसा— समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप !!

Chief Editor

Leave a Comment