
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित ‘आविष्कार २०२७’ या पुणे-मुंबई विभागीय फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ३० महाविद्यालयांतील २५० हून अधिक विद्यार्थी व शिक्षक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. विविध संशोधन शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांमुळे स्पर्धेत संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावी प्रत्यय आला.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशनसह निर्धारित पद्धतीनुसार आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. संशोधनाची गुणवत्ता, नावीन्यता, सादरीकरणातील स्पष्टता आणि प्रकल्पांची व्यावहारिक उपयुक्तता या निकषांवर परीक्षकांनी मूल्यमापन केले. तसेच विद्यार्थ्यांना संशोधन अधिक प्रभावी ठरणार करण्यासाठी मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.
समर्थच्या विद्यार्थ्यांची पदकांची कमाई
या विभागीय फेरीत यजमान समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे येथील कु. वैष्णवी मोरे हिने कृषी आणि पशुसंवर्धन या संशोधन शाखेतील पदवी स्तरावर सुवर्णपदक पटकावले. याच महाविद्यालयातील श्री. ऋषिकेश सोमवंशी याने वैद्यक व औषधनिर्माणशास्त्र शाखेत रौप्यपदक मिळवले. समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे येथील श्री. ओंकार भोर याने शुद्ध विज्ञान शाखेत रौप्यपदक प्राप्त केले. या यशामुळे संस्थेच्या संशोधनविषयक उपक्रमांना बळ मिळाले आहे.
विविध संशोधन शाखांतील विजेते
वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा : पदवी स्तरावर सुवर्णपदक कु. सुमैया शेख (ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे), रौप्यपदक कु. नम्रता हर्डे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे) आणि कांस्यपदक श्री. कृष्णा साळुंके (एमईएस मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) यांनी मिळवले. पदव्युत्तर स्तरावर श्री. गौरव खोताळ (नवसह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) याने पदक प्राप्त केले.
कृषी व पशुसंवर्धन : पदवी स्तरावर सुवर्णपदक कु. वैष्णवी मोरे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे), रौप्यपदक श्री. अनिकेत नेहरकर (एसएनबीपी कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) आणि कांस्यपदक कु. योगेश्वरी पाटील (नवसह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) यांनी पटकावले. पदव्युत्तर स्तरावर श्री. प्रतीक चव्हाण (नवसह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) याने पदक मिळवले.
शुद्ध विज्ञान : पदवी स्तरावर सुवर्णपदक श्री. आयुष माहुरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे), रौप्यपदक श्री. ओंकार भोर (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे) आणि कांस्यपदक कु. संतोषी चौधरी (सूर्यदत्ता कॉलेज ऑफ फार्मसी, बावधन) यांनी मिळवले. पदव्युत्तर स्तरावर कु. हर्षदा बंगर (नवसह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) आणि कु. निकिता गवळी (डेलोनिक्स सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती) यांनी पदके प्राप्त केली.
वैद्यक व औषधनिर्माणशास्त्र : पदवी स्तरावर सुवर्णपदक कु. आरती माळी (विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडी), रौप्यपदक श्री. ऋषिकेश सोमवंशी (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे) आणि कांस्यपदक कु. स्नेहा घुमरे (इंद्रायणी विद्या मंदिर केबीआरपी एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे) यांनी मिळवले. पदव्युत्तर स्तरावर सुवर्णपदक कु. नूतन कांबळे आणि रौप्यपदक कु. श्रुती जगताप (दोघीही अभिनव एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) यांनी पटकावले.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान : पदवी स्तरावर सुवर्णपदक कु. लक्ष्य गुप्ता (इंद्रायणी विद्या मंदिर केबीआरपी एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे), रौप्यपदक श्री. ओंकार बनकर (डेलोनिक्स सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती), तर कांस्यपदके श्री. प्रथमेश भुजबळ (एमईएस मोहंदास लोहिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी) आणि कु. अचल त्रिपाठी (सूर्यदत्ता कॉलेज ऑफ फार्मसी, बावधन) यांनी मिळवली. पदव्युत्तर स्तरावर कु. पौर्णिमा नवले (अभिनव एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) हिने सुवर्णपदक पटकावले.
मानवविद्या, भाषा व ललित कला : पदवी स्तरावर सुवर्णपदक कु. समीक्षा मालुसरे, रौप्यपदक कु. आर्या सोंटक्के (दोघीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे) आणि कांस्यपदक कु. माया कोलेकट (डेलोनिक्स सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती) यांनी मिळवले. पदव्युत्तर स्तरावर श्री. उत्कर्ष कोरडे (अभिनव एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) याने सुवर्णपदक प्राप्त केले.
या कार्यक्रमासाठी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे डॉ. संजय खोबरागडे, डॉ. संगीता मेटकर, डॉ. मधुरी भगत, प्रा. तेजस महागावकर, प्रा. अंकित जंगम आणि प्रा. शिवांजली पवार यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. आविष्कार कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शुभम गडगे, डॉ. शितल गायकवाड आणि डॉ. मंगेश होले यांनी नियोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी हाडवळे आणि प्रा. प्राची पडवळ यांनी केले.
विभागीय फेरीतील विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रा. प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले.



