
पंचनामा पिंपळगाव (खडकी) प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याने ऐतिहासिक वारसा लाभलेले असे प्रसिद्ध खडकी हे गाव!! खडकी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी मुलींनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. बालिका दिनानिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता चौथीच्या श्रीकर राज पाटील याने सूत्रसंचालन केले.प्रास्ताविकात शार्वी विनोद वाबळे हिची अध्यक्ष म्हणून निवड केली.या निवडीला ध्रुवा विकास भोर हिने अनुमोदन दिले. अध्यक्ष व सर्व शिक्षकांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.






इयत्ता पहिली ते चौथीच्या मुला मुलींनी भाषणे केली. यात सात्विक राज पाटील,सोहेब अकबर शेख, श्रीकर राज पाटील, स्वरा बाबाजी पोखरकर या मुलांनी भाषणे केली.यात इयत्ता पहिलीच्या सात्विक राज पाटील याचे भाषण उल्लेखनीय होते. सौ.वैजयंता विजय थोरात व श्रीमती नीता पंढरीनाथ पवार मॅडम यांनी मुलांना माहिती सांगून मार्गदर्शन करताना प्रत्येकाला मोठेपणी काय व्हावे असे वाटते हे विचारून प्रत्येकाची मोठेपणी कोणत्या क्षेत्रात काम करण्याची आवड आहे हे जाणून घेतले.


शेवटी अध्यक्ष शार्वी विनोद वाबळे हिचे भाषण झाले. श्री विजय एकनाथ थोरात यांनी सर्वांचे कौतुक करून आभार मानले. बालिका दिन व आनंददायी शनिवार निमित्त शाळेत संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत भाग घेतला.



