सामाजिक

त्याचं नशीब बलवत्तर;अपघातात एअर बॅग उघडल्या म्हणून वाचले दोघांचे जीव, आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीच्या वैदवाडी हद्दीत घडली दुर्घटना !!

img 20260219 wa0435

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी फाटा ते मंचर रस्त्यावर वैद्यवाडी फाटा नजीक बुधवार (दि.१८) रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याचा सुमारास जारकरवाडी हद्दीतील वैदवाडी रस्त्यावरील विज वाहतूक खांबाचा अंदाज न आल्याने कार खांबाला धडकल्याने कार मधील एक जखमी झाला आहे.रस्त्याला अडथळा ठरणारा विद्युत पोल तात्काळ हटवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाकडे केली आहे.

img 20260219 wa0433

या संदर्भात समजलेली माहिती अशी की,सदर कार एम.एच- १२/ व्ही.वो-६७५९ या कारने तिघे जण वैद्यवाडी फाटा मार्गे मंचरला जात असताना या रस्त्यालगत तापकीर वस्ती जवळ ३३ के.व्ही.चा विद्यूत खांब आहे.या खाबांचा अंदाज न आल्याने कार विद्यूत खाबांला धडकली व ३३ केव्हीची विद्यूत तार तुटली तार वरच्या वर अडकली व त्या ठिकाणी मोठा जाळ झाल्याचे या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.मात्र एअर बॅग उघडल्याने मोठा अपघात होता होता टळला. कारमधील एक जण जखमी झाल्याने त्याला पारगाव या ठिकाणी दवाखान्यात हलवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांची नावे मात्र समजू शकली नाही.

सदर रस्त्याचे काम तीन वर्षापूर्वी झाले आहे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या विद्युत पोलची माहिती महावितरण कंपनीला देऊन सदर विद्युत पोल हटविला पाहिजे होता परंतु संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे काम केले आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग की महावितरण हा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहिला आहे.

img 20260219 wa0435

सदर विद्यूत खांब महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहाता त्वरीत हटवावा यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज,सरपंच प्रतीक्षा बढेकर,मा.उपसरपंच सचिन टाव्हरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष दिपक विधाटे यांनी केली आहे.

fb img 1771121534243

Related posts

आदर्शगाव गावडेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात मासवडीचे जेवण;तीन हजार भाकरींचे नियोजन ;महिलांसाठी वीस पैठणींचा लकि ड्राॅ !!

Chief Editor

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार

Chief Editor

आता थांबायला हवं !!

Chief Editor

Leave a Comment