सामाजिक

लोणी-मंचर रस्त्यावर मध्यरात्री ट्रक जळून खाक; आगीचे कारण गुलदस्त्यात !!

1011469147
1011469147

लोणी परिसरात खळबळ; ट्रकला आग लागली की लावली ? याबाबत उलटसुलट चर्चा

पंचनामा प्रतिनिधी लोणी – आंबेगाव तालुक्यातील लोणी-मंचर रस्त्यावर लोणी गावाजवळ सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रकला अचानक आग लागून ट्रक जळून खाक झाला. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी-मंचर रस्त्यावर लोणी गावाजवळ हा ट्रक उभा असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याला आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सकाळी या ट्रकची जळालेली अवस्था पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

1011469133

दरम्यान, ट्रकला अचानक आग लागली की कोणीतरी आग लावली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेबाबत लोणी परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेच्या अनुषंगाने अद्याप पारगाव-कारखाना पोलिस ठाण्यात कोणाकडूनही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, हे स्पष्ट होण्यासाठी अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

ट्रकला आग लागण्यामागे तांत्रिक बिघाड, अपघात की अन्य काही कारण आहे, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या घटनेचे वास्तव समोर येण्याकडे लोणी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

1011423306

Related posts

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘लक्ष्मीतरू’ रोपांचे वाटप !!

Chief Editor

आंबेगावच्या पूर्व भागात कांदा लागवडीला सुरुवात ; चांगला पाऊस व वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल !!

Chief Editor

गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती !!

Chief Editor

Leave a Comment