सामाजिक

मुंबई गोदी कामगार सेवानिवृत्ती संघाचा चौथा मेळावा राजुरी येथे उत्साहात संपन्न !!

1011466298
1011466302

पंचनामा प्रतिनिधी राजुरी – मुंबई गोदी कामगार सेवानिवृत्ती संघाचा ४ था वार्षिक मेळावा आज दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री भैरवनाथ देवस्थान सभागृह, राजुरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या मेळाव्यात जुन्नर, आंबेगाव ,खेड, पारनेर तालुक्यासह इतर परिसरातील अनेक सेवानिवृत्त कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कामगारांनी आपल्या निवृत्ती वेतन, वैद्यकीय सुविधा व इतर प्रलंबित प्रश्नांबाबतच्या अडचणी मांडल्या.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष मा. मेंडोसा साहेब, मुंबई बंदर प्राधिकरणाचे विश्वस्त मा. प्रदीप नलावडे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव मा. बबनराव मेटे, मुं. पो. डॉक अँड जनरल युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मा. मारुती विश्वासराव व मा. कोलासो साहेब उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांनी सेवानिवृत्त कामगारांच्या अडचणी गांभीर्याने समजून घेतल्या.

या प्रसंगी मेंडोसा साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे अध्यक्ष मा. गेणभाऊ बांगर यांनी केली, तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संघाचे कार्याध्यक्ष मा.डी. बी. बांगर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री जिजाभाऊ औटी यांनी केले.राजुरी येथील सेवानिवृत्त सभासदांनी उपस्थितांसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था केली होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बबनदादा हाडवळे, सचिव -तुकाराम औटी, बाळासाहेब थोरात, दत्तू पडवळ, रामचंद्र हांडे,बाळा रभाजी औटी, अनिल श्रीपद औटी, बाळू आबा औटी, बाळू निघोट, पोपट भोर, राजाराम काळे, गुलाब बांगर, भगवान काळे व पंडित लोंढे, बाबुराव जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 399503
1011423306

Related posts

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध !!

Chief Editor

डॉ. हेमंतकुमार डुंबरे डॉक्टरेट पदवीने सन्मानीत ;राष्ट्रपती भेटीचे निमंत्रण” !!

Chief Editor

समर्थच्या खेळाडूंची विविध क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी ; मैदानी स्पर्धा, क्रिकेट, रायफल शूटिंग आणि कुस्तीमध्ये खेळाडूंचे उल्लेखनीय यश ; विभागीय स्तरासाठी अनेक खेळाडूंची निवड !!

Chief Editor

Leave a Comment