सामाजिक

जऊळके बुद्रुक येथे ठाकर समाजतील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

1010560337

पंचनामा प्रतिनिधी – जऊळके बु. (ता.खेड ) येथील वरची ठाकरवाडी आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना आस्ताना-ए-कलंदर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मोफत दप्तर व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

पुणे येथील आस्ताना – ए – कलंदर या ट्रस्टच्या वतीने जऊळके व इतर शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यां करिता दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.

यावेळी गुळाणी केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग आव्हाड , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक मेंगडे, सखी सावित्री समितीच्या सर्व महिला सदस्य, पालकवर्ग, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमासाठी अनुराग महाजन आस्ताना-ए-कलंदर ट्रस्टचे अध्यक्ष दत्ताभाऊ गुंजाळ, आशा नाईक तसेच विश्वस्त सुनील मांदळे यांनी विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत झाली.यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास, रंगसाहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र येवले यांनी केले तर आभार वल्लभ क्षिरसागर यांनी मानले.

1010560300
1010457105

Related posts

जिल्हा परिषद शिंगवे शाळेला A+ श्रेणी मानांकित !!

Chief Editor

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत ‘चरण सेवा’ उपक्रम !!

Chief Editor

वैदवाडी (जारकरवाडी ) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन !!

Chief Editor

Leave a Comment