सामाजिक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा ; मागण्यांबाबतचे विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय !!

1010560728
1010560728

पंचनामा प्रतिनिधी – शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, पीक विमा, इनाम व गायरान जमिनी, भूमिहीन कुटुंबांच्या घराच्या जागा तसेच खतांचा तुटवडा व लिंकिंग आदी मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित मागण्यांबाबत आवश्यक कार्यवाही करून विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

1010560300

Related posts

डॉ. अलेक्झांडर गिबसन समाधी – भारतीय वनसंवर्धनाचा प्रेरणादायी वारसा !!

Chief Editor

वडगावपीर येथे गणपती-महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ; गुळवे वस्तीवर रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !!

Chief Editor

लोणी-धामणी परिसरात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत ; ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटण्याची भीती !!

Chief Editor

Leave a Comment