राजकीय

शिरदाळे येथे भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला ; प्रसंगावधान राखल्याने माय-लेक बचावले !!

img 20260814 wa0292

पंचनामा प्रतिनिधी – आज सकाळी गोठ्यावर दूध काढण्यासाठी जातं असताना शिरदाळे येथे भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे सौ. रुपाली उत्तम रणपिसे व त्यांचा मुलगा शिवम उत्तम रणपिसे हे जखमी झाले आहेत.

रोजच्या प्रमाणे गोठ्यावर दूध काढण्यासाठी जातं असताना रस्त्यात एक आठ ते दहा कुत्र्यांचा कळप बसला होता. सुरवातीला त्यांनी शिवम वर हल्ला केला परंतु त्याची आई सोबत होती त्यांनी त्याला उचलून समोरच्या बाजूला ढकलून दिले त्यानंतर त्या कुत्र्यांनी रुपाली रणपिसे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व शरीरावर बऱ्याच ठिकाणी चावा घेतला त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर जवळच असलेले कांताराम तांबे यांनी धावत येऊन त्या कुत्र्यांना हुसकावून लावले परंतु तो पर्यंत त्या कुत्र्यांनी बराच चावा त्यांना घेतला होता.

भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता त्याच्यावर प्रतिबंध आणणे गरजेचे असून या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कारण अनेक लहान मुले सुट्टीच्या दिवशी किव्हा इतर वेळी गावात वावरत असतात परंतु या कुत्र्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे.त्याच्यावर काही तरी ठोस उपयोजना करने गरजेचे असल्याचे हल्ला झालेल्या महिलेचे पती उत्तम रणपिसे यांनी सांगितले.

तर ज्या नागरिकांकडे पाळीव कुत्रे आहेत त्यांनी आपापली कुत्रे बांधून ठेवायला हवीत तसेच त्याचा त्रास स्थानिक गग्रामस्थाना होता कामा नये अशी देखील ग्रामस्थ्यांची इच्छा आहे. गावात असलेली पहिली स्थानिक कुत्रे तसेच बघेरून आलेली काही कुत्रे यांचा देखिल संघर्ष जोत असून त्यामुळे देखील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कुत्र्यांवर तात्काळ काहीतरी कार्यवाही करावी अशी मागणी शिरदाळे ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.


भटक्या कुत्र्यांचा नाहक त्रास आमच्या ग्रामस्थ्यांना सहन करावा लागत आहे. आजचा हल्ला ते लहान बाळ थोडक्यात बचावले परंतु जर असे प्रकार वारंवार झाले तर ते एक दिवस कोणाच्या तरी जीवावर भेतु शकते त्यामुळे त्या कुत्र्यांचा योग्य बनोबस्त करने गरजेचे आहे तसेच ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत त्यांनी देखील जबाबदारीने त्यांना बांधून ठेवणे गरजेचे आहे.
श्री. मयूर सरडे
(मा. उपसरपंच शिरदाळे )

1010560300
1010457105

Related posts

महाशिवरात्री निमित्ताने कोपरगावात नगरपरिषद मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे — अरुण खरात

Chief Editor

मृत्यूच्या दांडीवर लोककलेचा जीवघेणा खेळ खेळणाऱ्या रघुवीरचा पद्मश्रीने गौरव!! -विश्वास पाटील

Chief Editor

धामणीच्या खंडेरायाला वातानुकूलित यंञ अर्पण !!

Chief Editor

Leave a Comment