राजकीय

धामणीच्या खंडेरायाला वातानुकूलित यंञ अर्पण !!

fb img 1774661444136
fb img 1774661449199

पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता. आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात चैञ पौर्णिमेला (२एप्रिल २६) वाळूंजनगर (लोणी) येथील भाविक श्रीकांत अर्जुन वाळूंज पा. यांनी वातानुकूलित यंञ (ए.सी.)अर्पण केला असल्याचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.

देवस्थानाच्या मुख्य गाभार्‍यातील हवेचे तापमान आणि आर्द्रता नियंञीत करण्यासाठी व खंडोबाचे दर्शनासाठी येणार्‍या शेकडो भाविकांचे सुविधेसाठी प्रख्यात गोदरेज कंपनीचा ए.सी.(Air conditioner)खंडेरायाला अर्पण केला असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी ग्रामस्थ व सेवेकर्‍यांनी श्रीकांत वाळूंज यांचा सत्कार केला.यावेळी सेवेकरी दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत,सुभाष तांबे,नामदेव भगत,अनिरुध्द वाळूंज,तिर्थराज लोंखडे,चेतन सिनलकर उपस्थित होते.

Related posts

पारगाव (शिंगवे ) येथील चिचगाई स्मशानभूमी परिसर सुधारणा भूमिपूजन संपन्न !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) गावाने राज्यातील लोकांसाठी घालून दिला अनोखा आदर्श !!

Chief Editor

मृत्यूच्या दांडीवर लोककलेचा जीवघेणा खेळ खेळणाऱ्या रघुवीरचा पद्मश्रीने गौरव!! -विश्वास पाटील

Chief Editor

Leave a Comment