राजकीय

मतदारसंघातून गायब खासदार मिसळ पार्टीत दिसल्याची चर्चा !!

img 20260414 wa0448
img 20260412 wa0443

पंचनामा प्रतिनिधी- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे मतदारसंघातून गायब असल्याची चर्चा रंगत असतानाच ते मिसळ पार्टीत दिसल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची तसदी न घेणारे खासदार अचानक अशा मिसळ पार्टीत दिसल्याने शेतकरी तसेच त्यांच्या प्रचारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आंबेगाव तालुक्यात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे मतदारसंघात क्वचितच दिसत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

३१ मार्च रोजी उत्तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. विशेषतः आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मा.मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील तसेच मा. खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेसह नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

भीमाशंकर साखर कारखान्याचे मा.अध्यक्ष देवदत्त निकम आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनीही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.मात्र खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अद्याप नुकसानग्रस्त भागांना भेट दिली नसून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडुन नाराजी व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी काम करण्याचे आश्वासन खासदार कोल्हे कडुन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

खासदार अमोल कोल्हे हे अधिवेशनात व्यस्त असले तरी त्यांनी अवकाळी पावसामुळे बाधित भागांना भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. कोल्हे यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता; मात्र विजयानंतर त्यांचा संपर्क कमी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींना सामोरे जात असून खासदारांनी जनतेसाठी वेळ देऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.

लोकसभा निवडणुकीत आंबेगावचे स्थानिक उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत अनेक कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हे यांचा प्रचार केला होता. मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये खासदार अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून “निवडणुकीत वापर करून नंतर दुर्लक्ष केले” अशी चर्चा आंबेगाव तालुक्यात सुरू आहे.

“मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम अधिक चांगले होते”

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतल्यास मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम अधिक प्रभावी होते, अशी भावना काही नागरिक व्यक्त करत आहेत.आढळराव पाटील हे शेतकरी व कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात कायम उपस्थित राहत असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असायचे. त्यांच्या तुलनेत सध्याचे खासदार मतदारसंघात कमी सक्रिय असल्याची टीका होत आहे.
यामुळे “लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना डावलणे ही चूक ठरली का?” असा प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघात चर्चिला जात आहे.

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) गावाने राज्यातील लोकांसाठी घालून दिला अनोखा आदर्श !!

Chief Editor

महाशिवरात्री निमित्ताने कोपरगावात नगरपरिषद मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे — अरुण खरात

Chief Editor

पारगाव (शिंगवे ) येथील चिचगाई स्मशानभूमी परिसर सुधारणा भूमिपूजन संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment