राजकीय

जवळे (ता.आंबेगाव) गावाने राज्यातील लोकांसाठी घालून दिला अनोखा आदर्श !!

img 20251226 wa1206

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायत जवळे येथे गावच्या सर्वांगीण विकासामध्ये ज्यांचा मोलाचा हातभार लागतो अशा सर्व कर्मचारी, सेवक वर्ग की ज्यांनी ५ वर्ष मोलाची साथ दिली त्यांना जवळे ग्रामपंचायच्या आदर्श सरपंच सौ वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प,शाल, सन्मान चिन्ह, देऊन सन्मानित करण्यात आले.

img 20251226 wa1203

यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्रीमती सविता गांजाळे (मुख्याध्यापिका) श्रीमती वनिता बारभाई,चेतन बेंढारी (मुख्याध्यापक) अंगणवाडी सेविका शालन सोनवणे,संगीता वाळुंज, मदतनीस शशिकला गावडे,जयश्री शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक लोखंडे,भूपेंद्र वाळुंज ग्राम,रो,सेवक, ग्रामपंचायत कार्यकारणी हरिचंद्र शिंदे, दत्तात्रय लायगुडे,अमोल वाळुंज, चंद्रकला गायकवाड,संगीता साबळे,शुभांगी खालकर ,प्रमिला गावडे, ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे, सुनंदा शिंदे आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी सविता गांजाळे मुख्याध्यापिका, बेंडारी सर यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी मोठ्या संख्येने जवळे ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या.

Related posts

पारगाव (शिंगवे ) येथील चिचगाई स्मशानभूमी परिसर सुधारणा भूमिपूजन संपन्न !!

Chief Editor

मतदारसंघातून गायब खासदार मिसळ पार्टीत दिसल्याची चर्चा !!

Chief Editor

धामणीच्या खंडेरायाला वातानुकूलित यंञ अर्पण !!

Chief Editor

Leave a Comment