राजकीय

पारगाव (शिंगवे ) येथील चिचगाई स्मशानभूमी परिसर सुधारणा भूमिपूजन संपन्न !!

img 20251226 170801
img 20251226 170801

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

ग्रामपंचायत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते चिचगाई स्मशानभूमी परिसर सुधारणा १०:५० लक्ष आर.सी.सी स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन करण्यात आले.

पारगाव संगमेश्वर मंदिराच्या समोर च्या बाजूस त्रिवेणी संगमावर गेली अनेक वर्ष चिचगाई मळ्यातील धार्मिक अंत्यसंस्कार होत होते.परंतु सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य,श्री.किरण ढोबळे यांनी पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १०:५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला व आज त्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

त्यावेळी पारगाव गावच्या सरपंच श्वेताकिरण ढोबळे, रोहिणी देवडे, ग्रामपंचायत सदस्य,विठ्ठल ढोबळे, काळूराम लोखंडे, दत्ताराम वैद,वीरेंद्र ढोबळे, तसेच राजू ढोबळे, शिवराम ढोबळे, गोविंद पवार, कोंडीभाऊ ढोबळे, महादू ढोबळे, शांताराम भगवंत ढोबळे,सचिन ढोबळे, अजय ढोबळे, बाळासाहेब आडवळे, अविनाश ढोबळे, प्रथमेश ढोबळे, आदित्य ढोबळे, संदीप लोखंडे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

महाशिवरात्री निमित्ताने कोपरगावात नगरपरिषद मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे — अरुण खरात

Chief Editor

धामणी (लोणी) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; विठ्ठल जाधव यांना शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

मतदारसंघातून गायब खासदार मिसळ पार्टीत दिसल्याची चर्चा !!

Chief Editor

Leave a Comment