सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) गावाने टाकली कात !! मुख्यमंत्री पंचायत राज अभियानानिमित्त गावचे रूपडे पालटले!!

img 20251226 wa1240

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानानिमित्त गावांमधील मुख्य चौक परिसरातील, ग्रामदेवतेचे मंदिर मंदिर परिसर,ओपन जिम, ग्रामपंचायत पटांगण, स्मशानभूमी परिसर, तसेच रस्ते दुथर्फा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या स्लोगन असलेल्या पाट्या ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आलेल्या आहेत.स्मशानभूमी या ठिकाणी नव्याने सौर दिवा लावण्यात आला आहे.शाळा अंगणवाडी या ठिकाणी बोलक्या भिंती रंगवण्याचे काम चालू असून सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.गावातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे.मुख्यमंत्री पंचायतराज अभियानामध्ये ग्रामपंचायत जवळे सहभागी आहे अशी माहिती जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

या सर्व अभियानात सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे,कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

Related posts

मंचर येथे अनुसया महिला उन्नती केंद्राच्या लोकसेवेचा गौरव; तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांच्या हस्ते सन्मान !!

Chief Editor

कलावंतांचे अप्रकाशित साहित्य शासनाने प्रकाशित करावे – अरुण खरात

Chief Editor

जुन्नर तालुक्यातील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अभिमानास्पद यश — GPAT व GATE 2026 मध्ये दमदार कामगिरी !!

Chief Editor

Leave a Comment