सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता ; मृत गाय आणि मेलेल्या कोंबड्यांची तत्काळ लावली विल्हेवाट !!

img 20251227 wa1110

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – मौजे जवळे या ठिकाणी वन विभाग हद्दीमध्ये अज्ञात व्यक्ती यांनी रात्रीच्या वेळी मृत गाई तसेच पोल्ट्री व्यावसायिक आजूबाजूच्या परिसरातील यांनी मृत कोंबड्या या वन विभाग हद्दीमध्ये ग्रामपंचायत जवळे कार्यक्षेत्रात आणून टाकलेले आहेत याची माहिती ग्रामस्थांनी जवळे ग्रामपंचायतच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांना दिली. त्यांनी तात्काळ वन विभागाचे अधिकारी विकास भोसले यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.

img 20251227 wa1110

त्यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी भोसले यांनी तात्काळ त्या ठिकाणी आपले वन कर्मचारी यांना पाठवून घटनेची माहिती घेतली तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच वनविभाग हद्दीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील अशी माहिती दिली व अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी ग्रामस्थांनीही ग्रामपंचायत व वन विभाग यांच्या संपर्कात राहून असे कृत्य करणाऱ्यांचे नाव कळवावे त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल असे सांगितले.

या ठिकाणी प्रत्यक्ष बोत्रे वनरक्षक, वनपाल फुलमाळी, वन कर्मचारी महेश टेमगिरे , सरपंच यांच्या समवेत पाहणी केली व तात्काळ त्या ठिकाणी खड्डा घेऊन गाय व कोंबड्या दफन करण्यात आले आहे.या बद्दल स्थानिकांनी ग्रामपंचायत व वनविभाग यांचे आभार मानले आहेत.

img 20251227 wa1115

Related posts

नाशिक येथे उद्यापासून दि.२ फेब्रुवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपन्न होणार छायाचित्र प्रदर्शन !!

Chief Editor

पंचनामा विशेष – आठवणीतील माणसे…

Chief Editor

सूर्य शक्ती प्रकल्पांतर्गत शेतीस उपयुक्त सौर व तांत्रिक साहित्याचे लाभार्थ्यांना वितरण !!

Chief Editor

Leave a Comment