सामाजिक

पारगाव (ता.आंबेगाव) येथील दीड वर्षाच्या घोडीवर बिबट्याचा हल्ला !!

1009476217
1009476217

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पुर्व बाजूलाच संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मेंढपाळ हे मुक्कामी साठी होते.रात्री ठीक २.३० च्या सुमारास बापू शिंदे तसेच बबन शिंदे मेंढपाळ यांच्या दीड वर्षाच्या घोडीवर नरभक्षक बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात घोडी जागीच मृत पावली आहे यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या कुटुंबाला नुकसान भरपाईची मागणी मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली आहे.

यावेळी शेतकरी संतोष ढोबळे,बापु शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.मोरगाव सुपा (बारामती) बापू शिंदे आणि बबन शिंदे हे दोघे बंधू असून हे गेल्या अनेक वर्षांपासून पारगाव परिसरात मेंढपाळसाठी वास्तव्यास आहेत.याबाबत वनविभागाच्या पुजा कांबळे,अशोक जाधव यांनी पंचनामा केला आहे.

पारगाव धामणी बीटच्या निलम चव्हाण यांना फोन द्वारे सदर घटनेची माहिती दिली. मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी वनविभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावला जाईल असे सांगितले आहे.

fb img 1774661449199

Related posts

जारकरवाडीच्या तरुणांनी जपली आषाढी बारशीच्या अन्नप्रसादाची अनोखी परंपरा !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत झाली डिजिटल !!

Chief Editor

श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment