सामाजिक

बी. जे. एस. विद्यालय वाघोली येथील डॉ.विष्णू देवडकर विद्यापीठाच्या (Ph.D.) पदवी ने सन्मानित !!

img 20260514 wa0399

पंचनामा प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील बिजनेस प्रॅक्टिसेस या विषयामध्ये संशोधक विद्यार्थी देवडकर विष्णू शिवराम यांनी यशस्वीरित्या “विद्यावाचस्पती (Ph.D.)” पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक, सामाजिक तसेच मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संशोधन क्षेत्रात उच्च शिक्षण घेणे ही अत्यंत मेहनत, चिकाटी आणि सातत्याची बाब मानली जाते. अनेक वर्षांच्या अभ्यास, संशोधन, माहिती संकलन व विविध शैक्षणिक प्रक्रियांतून जाऊन ही पदवी प्राप्त करावी लागते. देवडकर विष्णू शिवराम यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आपले संशोधन पूर्ण करून ही मानाची पदवी संपादन केली आहे. त्यांच्या संशोधन कार्यामुळे बिजनेस प्रॅक्टिसेस या विषयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळाले असल्याचे मानले जात आहे.

या संशोधन कार्यासाठी त्यांना संशोधन मार्गदर्शक प्रा. (डॉ.) लांडगे बळवंत भीमराव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच रिसर्च सेंटरचे गाईड प्रा. (डॉ.) किशोर देसरडा सर आणि प्रा. (डॉ.) विनोद कुलकर्णी सर यांचेही सहकार्य लाभले. संशोधन केंद्राचे प्रमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. (डॉ.) मनीषा बोरा मॅडम यांनी संशोधनासाठी आवश्यक प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले.

या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी सर, उपकुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर सर, अधिष्ठाता प्रा. (डॉ.) सुप्रिया पाटील मॅडम तसेच वाणिज्य शाखेच्या प्रमुख प्रा. (डॉ.) श्यामला मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. बिजनेस प्रॅक्टिसेस बोर्डाचे चेअरमन डॉ. मारोती केकाने सर, परीक्षक प्रा. (डॉ.) दिलीप चव्हाण सर तसेच संस्था प्रतिनिधी श्री. सुरेश (बापू) साळुंके सर यांनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

fb img 1774661444136

देवडकर विष्णू शिवराम यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये, मित्रपरिवारात व शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे. भविष्यातही त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे, अशा शुभेच्छा विविध स्तरातून व्यक्त करण्यात येत आहेत.

Related posts

निष्काम सेवेचा सुगंध, समर्पणाचे तेज – ७९वा वार्षिक निरंकारी संत समागम ; जिथे प्रत्येक पाऊल सेवेकडे आणि प्रत्येक भाव समर्पणाकडे !!

Chief Editor

चिमण्या वाचवा, निसर्ग टिकवा! पहाडदरा येथे ‘टीव्हीएस कंपनीच्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट’तर्फे जागतिक चिमणी दिन साजरा !!

Chief Editor

केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !!

Chief Editor

Leave a Comment