सामाजिक

देवांश गणेश कापडी ने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत संपादित केले धवल यश; यशची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे निवड !!

1009465069
1009465069

पारगाव (शिंगवे) ता.आंबेगाव येथील डि.जी.वळसे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी देवांश गणेश कापडी याने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश संपादन केले असुन त्याची निवड राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे झाली आहे.देशभरातुन एकुण ३६५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात देवांश याने यश मिळवले आहे.

मिलिट्री स्कूल (RMS) या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणार्या निवासी शाळा असुन या शाळा इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत C.B.S.E अभ्यासक्रमानुसार शिक्षण देतात आणि लष्करी नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांची जडणघडण करतात.

सध्या भारतात हिमाचल प्रदेशातील चैल, राजस्थानमधील अजमेर आणि ढोलपूर, तसेच कर्नाटकातील बंगळुरू आणि बेळगाव येथे या ५ आरएमएस शाळा आहेत.या शाळांची स्थापना १९२५ मध्ये झाली असुन या शाळेत इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी प्रवेश दिला जातो.

CET सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.येथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात असुन.NCC प्रशिक्षण, क्रीडा आणि शैक्षणिक दिले जाते. १० ते १२ वर्षे (६ वी साठी) आणि १३ ते १५ वर्षे (९ वी साठी) वयोगटातील मुले/मुली यांची निवड केली जाते.

भारतातील ५ राष्ट्रीय मिलिट्री स्कूल RMS चैल (हिमाचल प्रदेश) अजमेर (राजस्थान),RMS ढोलपूर (राजस्थान),RMS बेळगाव (कर्नाटक)RMS बंगळुरू (कर्नाटक)येथे असुन दर वर्षी देशभरातुन ३६५ विद्यार्थ्यी येथे निवडले जातात. त्यातून 36 सिविलियन विद्यार्थ्यांची निवड होते.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील देवांश अश्विनी गणेश कापडी याची निवड झाली असून राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षेत 150 पैकी 138 गुण मिळाले आहे तसेच ऑल इंडियन सैनिक स्कूल परीक्षेत 300 पैकी 270 गुण मिळाले आहे.आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दोन मोठ्या परीक्षा ती यश मिळाले आहे.परीसरातुन त्याचे कौतुक होत आहे.

देवांश याची आई अश्विनी कापडी/ लबडे भारतीय सैन्य दलात सीमा सुरक्षा दलात काम करते. तर वडील गणेश कापडी पुणे येथे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत आहेत. घरातूनच सैनिकी वारसा लाभलेल्या देवांश याला भविष्यात देश सेवेसाठी जबाबदार नागरिक व अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने व काम करण्याची इच्छा आहे.

fb img 1774661449199

Related posts

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

Chief Editor

आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, निश्चित ध्येय असल्यास यश निश्चित – लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक

Chief Editor

श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment