सामाजिक

टी.व्ही.एस कंपनीच्या वतीने खडकवाडी येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा !!

img 20260309 wa0620

पंचनामा प्रतिनिधी – TVS Motor Company च्या सामाजिक बांधिलकी उपक्रमा अंतर्गत श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट (पुणे-पाबळ) यांच्या वतीने खडकवाडी येथे ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास खेड आंबेगाव आणि शिरूर मधील साधारण २५० महिला उपस्थित होत्या.

यावेळी कार्यक्रमाची थिम हि संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. त्या नुसार कार्यक्रम आयोजन करण्यात आला. यावेळी महिलांना सेंद्रिय शेती, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सक्षमीकरणाचे माहिती देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ.मालन जाधव यांनी केले. यात कार्यक्रम घेण्याचा उद्देश त्यांनी सविस्तर मांडला.त्यासोबत TVS – श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट चे गावविकासाचे काम भारतामध्ये महाराष्ट्र ,तामिळनाडू, आंध्र प्रदेश , कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यात साधारण २५०० गावांमध्ये समाजविकासाचे काम सुरु आहे.

img 20260309 wa0620

महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ११४ वाड्यावस्त्या वरती गावविकासाचे सुरु आहे. संस्थेचे महिला सक्षमीकरण,शेती, पशुधन,आरोग्य, शिक्षण,पाणलोट विकास आणि शाळा व अंगणवाडी मध्ये पायाभूत विकासाचे काम केले जाते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या सौ.निवेदिता शेटे गृहविज्ञान विभाग प्रमुख कृषि विज्ञान केंद्र नारायनगाव, प्रमुख वक्त्या सौ. सोनल शिंदे वरिष्ठ वैज्ञानिक शाश्वत फार्मिंग फौंडेशन, प्रमुख पाहुण्या सौ.राजश्री पवार (कृषी सहाय्यक अधिकारी ) कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.सविता डोके सरपंच खडकवाडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी TVS-श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट चेन्नई मुख्य कार्यलयात मानव संसाधन विभाग प्रमुख श्री. व्ही. के.राजकिरण उपस्थित होते. या कार्यक्रमास खेड आंबेगाव आणि शिरूर मधील साधारण २५० महिला उपस्थित होत्या.

ट्रस्टच्या वतीने महिलांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामध्ये दशपर्णी अर्क, जीवामृत, घनजीवामृत, कंपोस्ट खत, आले-लसूण-मिरची कीडनाशक आणि फेरोमेन ट्रॅप यांसारख्या आधुनिक व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश होता.

कार्यक्रमात बोलताना सौ.निवेदिता शेटे यांनी ‘जय जवान, जय किसान, जय माझी शेतकरी महिला’ अशा घोषणा देऊन महिलांना प्रोत्साहित केले. त्या म्हणाल्या की, “महिला सक्षमीकरण हे केवळ आर्थिक नसून ते शारीरिक आणि मानसिक अशा तिन्ही स्तरांवर होणे गरजेचे आहे.” तसेच त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे आणि सन्मानाचे महत्त्व विषद केले.

प्रमुख वक्त्या सौ. सोनल शिंदे यांनी ‘शेती आणि मातीचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेती करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

कृषी सहाय्यक अधिकारी सौ.राजश्री पवार यांनी उपस्थितांना कृषी विभाग च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. त्यांनी ‘महा विस्तार AI’ या मोबाईल ॲपबद्दल माहिती देताना सांगितले की, या ॲपचा वापर करून शेतीतील समस्या कशा सोडवता येतील आणि प्रगत शेती कशी करता येईल, हे महिलांना समजून सांगण्यात आले.

या प्रसंगी आदर्श काम करणाऱ्या ८ बचत गटांना ‘आदर्श बचत गट पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले:
१. भक्ती महिला बचत गट (गुळाणी, खेड )
२. मोरया महिला बचत गट (खडकवाडी,आंबेगाव )
३. सरस्वती महिला बचत गट (कान्हूर मेसाई,शिरूर )
४. श्री गणेश महिला बचत गट (जारकरवाडी,आंबेगाव )
५. मानिनी महिला बचत गट (वडगाव पीर,आंबेगाव)
६. मुक्ताई महिला बचत गट (गोसासी,खेड)
७. श्री स्वामी समर्थ महिला बचत गट, (धामणी, आंबेगाव )
८. भैरवनाथ महिला बचत गट (पारगाव तर्फे खेड,आंबेगाव)

पुरस्कारानंतर अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत TVS Srinivasan Services Trust च्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. TVS Srinivasan Services Trust ने केवळ महिला दिन साजरा न करता महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करून आपली सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्य्रक्रमाचे आभार सौ.पुष्पा लंके यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन TVS-Srinivasan Services Trust च्या सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.

fb img 1771121541695

Related posts

धामणी (लोणी) येथे मानाच्या काठ्यांची मिरवणूक !!

Chief Editor

आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात विविध उपक्रमांचे नियोजन !!

Chief Editor

Leave a Comment