
पंचनामा प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव) हे तालुक्यातील पूर्वेकडील डोंगराळ गाव !!!पावसाळ्यात मात्र याच परिसराने हिरवी शाल पांघरल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.त्यात भर म्हणून की काय गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात वाढलेली मोरांची संख्या देखील लक्षणीय झाली आहे.

सुरवातील याचे ग्रामस्थांना आकर्षण होते परंतु काही दिवसांनी याच मोरांचा तोटा देखील शेतकरी वर्गाला सहन करावा लागतो.कारण पावसाळ्यात पेरलेली अनेक पिके हे मोर फस्त करून टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान देखील होत आहे.परंतु याला पर्याय देखील नाही.सुरवातील मोजकी संख्या असणाऱ्या मोरांची संख्या आज शेकडो मधे गेली आहे तर भविष्यात ती हजाराच्या घरात देखील जाऊ शकते.

आज मितीला परिसरात अंदाजे ७०० ते ९०० पर्यंत मोर असू शकतात असे निसर्गप्रेमी आणि मा.उपसरपंच मयूर सरडे यांनी सांगितले आहे.त्यांनी शेतात गेल्यावर अनेक त्यांचे फोटो वीडियो आपल्या कैमरामधे कैद केले आहेत.

शिरदाळे परिसर हा तसा पावसाळ्यात एक पर्यटन स्थळ म्हटल तरी वावगे होणार नाही कारण सागदरा परिसर की जिथे असणारे सागवानाचे दुर्मिळ जंगल आहे.शिरदाळे गाव तलाव,त्यानंतर शेतात दिसणारे काही दुर्मिळ प्राणी जसे की कोल्हे,तरस,लांडगे,बिबट्या हे प्राणी तर त्यात आता मोर या पक्षाची पडलेली भर यामुळे हा संपूर्ण परिसर जुलै ते सप्टेबर या तीन महिन्यात चांगलाच हिरवागार आणि मनमोहक असतो.तसेच पावसाळ्यात अनेक रानभाज्या देखील या परिसरात मिळत असतात.त्यामुळे याच काळात येणारा आखाड महिना असल्यामुळे अनेक आखाड प्रेमी या परिसरात पार्ट्या करण्यासाठी येत असतात.त्या मंडळींनी देखील निसर्गला हानी न पोहचवता या पार्ट्या केल्या तर स्थानिक देखील याला आक्षेप घेत नाहीत.त्यामुळे भविष्यात हा परिसर एक पर्यटन स्थळ म्हणून पुढे येऊ शकतो.

स्थानिक प्रशासन,ग्रामस्थांच्या मदतीने जर पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला तर यात नक्कीच भर पडेल असे मा.सरपंच आणि प्रशासक सुप्रिया मनोज तांबे,उपसरपंच बिपिन चौधरी,मा.सरपंच वंदना गणेश तांबे,मा.सरपंच जयश्री संतोष तांबे यांनी सांगितले आहे.

मोर हा आपल्या राज्य पक्षी आहे.त्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य जरी असले तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे तोट्याचे आहे.अनेक पिके ते नाहीसे करतात.त्यामुळे शेती म्हणून ते तोट्याचे आहे.परंतु पर्यटनाच्या दृष्टीने मोराच्या चिंचोली नंतर आमचा शिरदाळे परिसरात मोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
श्री.मयूर सरडे (निसर्गप्रेमी आणि मा.उपसरपंच शिरदाळे)



