सामाजिक

मा.सैनिक, निसर्ग मित्र श्री.रमेश खरमाळे यांनी हरित संकल्पातून साजरा केलेला लग्नाचा वाढदिवस !!

fb img 1774754881061
fb img 1774754881061

पंचनामा विशेष – आमच्या वैवाहिक जीवनाला २३ वर्षे पूर्ण होत आहेत… आयुष्याच्या या सुंदर प्रवासात एकमेकांचा हात धरून चालताना, केवळ संसार नाही तर निसर्गसेवेचाही एक पवित्र संकल्प आम्ही मनाशी जपला !!

या निमित्ताने आम्ही दोघांनी मिळून दुर्मिळ होत चाललेल्या रिठा वृक्षांच्या तब्बल ७००० बियांचे संकलन केले. या प्रत्येक बियामध्ये एक नवीन जीवन दडलेले आहे, एक हिरवे भविष्य दडलेले आहे… आणि याच भावनेतून या बिया आम्ही संत तुकाराम महाराज आणि श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करून, त्या पुन्हा येणाऱ्या पावसाळ्यात निसर्गाला समर्पित करण्याचा संकल्प केला होता.

आज हा संकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे… आणि उद्या आणखी ३००० बियांचे संकलन करून १०,००० बियांचा हा हरितसंकल्प पूर्ण करत, आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहोत.

हा वाढदिवस केवळ आमच्या नात्याचा उत्सव नाही, तर तो निसर्गाशी असलेल्या नात्याचा सुद्धा उत्सव आहे…

fb img 1774754885803

कारण झाडे लावणे म्हणजे केवळ पर्यावरण वाचवणे नव्हे, तर पुढच्या पिढ्यांसाठी जीवनाचा श्वास साठवून ठेवणे होय.आपणही आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण असा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा छोटासा संकल्प केला, तर निसर्ग नक्कीच आपल्यावर ऋणी राहील.

चला, वाढदिवस, वर्धापनदिन, सण—प्रत्येक क्षण हरित करूया…
आणि पृथ्वीला पुन्हा एकदा हिरवीगार बनवूया…
जय पर्यावरण!

fb img 1773887068819

Related posts

हा रस्ता धुक्यात नव्हे तर धुळीत हरवला !!

Chief Editor

Canine Distemper Virus (CDV) — वन्यजीवांसाठी वाढता अदृश्य धोका !!

Chief Editor

कनेरसर–पाबळ रस्ता मृत्यूचा सापळा; दोन वर्षांपासून दुर्लक्ष, नागरिकांचा संताप !!

Chief Editor

Leave a Comment