सामाजिक

सिझन पूर्वी तमाशाची रूपरेषा आखून सर्वत्र त्याची अंमलबजावणी करावी – मा.मुसाभाई इनामदार

img 20260329 wa0209

पंचनामा प्रतिनिधी – सौंदर्यतारका मालती इनामदार लोकनाट्य तमाशा फडाचे मालक मा.मुसाभाई इनामदार यांची आज दिनांक २८/३/२०२६ रोजी मुलाखत आज तमाशा पंढरी काळज येथे घेतली, यावेळी अनेक तमाशा मॅनेजर उपस्थित होते.मा.मुसाभाई म्हणाले की,गुढी पाडव्याला जो प्रत्येक वर्षी रिस्पॉन्स तमाशा फडांना नारायणगाव येथे मिळतो तो यावर्षी रिस्पॉन्स मिळालेला नाही .दहा ते वीस टक्के कमी धंदे झालेत याला कारण शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे. काही गावच्या यात्रा बंद आहेत.याचा परिणाम तमाशाच्या धंद्यावर झालेला आहे.

तमाशात जो चार तासाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये फक्त दीड तासाची गाणी असावीत आणि अडीच तासाचा कार्यक्रम गण गौळण आणि वगनाट्याचा असला पाहिजे.असे मा.मुसाभाई इनामदार यांनी सांगितले.

जुना तमाशा आज येणार नाही रसिक आवडीवर कार्यक्रमाचे गणित अवलंबून आहे ते कुणाच्या हातामध्ये नाही. जे काही रसिक अत्यंत दारू पिऊन कार्यक्रमात बसतात. त्याच्यामुळे कार्यक्रमाचं नुकसान होते आहे.

कार्यक्रमांमध्ये रसिकांनी कलेचे भरभरून कौतुक केले पाहिजे ,तरच कलावंताला यातून प्रोत्साहन मिळणार आहे ,प्रतिसाद दिला तरच कलावंत खऱ्या अर्थाने रंगमंचावर कला करू शकतात.

तमाशाची आर्थिक घडी चांगली बसविण्यासाठी तमाशा फडाने कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल हे पाहिले पाहिजे.त्याशिवाय तमाशा फड कर्जमुक्त होणार नाही.तमाशावाल्यांची संघटना होणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वांनी एकत्र घेऊन चांगला विचार केला ,तर चांगल्या प्रकारे दिवस येतील.वगनाट्यामध्ये पाच ते सात गाणे टाकली पाहिजे म्हणजे रसिक वगनाट्यासाठी थांबतील.
वगनाट्याच्या सीनला धरून गाणी पाहिजेत.

तमाशा सिझनचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित होणे गरजेचे आणि ती तयार झालेली रूपरेषा प्रत्येक तमाशा फडाला दिली पाहिजे आणि त्याचप्रमाणे कार्यक्रम केला पाहिजे.
असेच बंधन असले पाहिजे.
तशीच तयार केलेली रूपरेषा यात्रा कमिटीला दिली पाहिजे ,दाखवली पाहिजे आणि त्यानुसारच कार्यक्रम गावात केला पाहिजे.

मा. मुसाबाई इनामदार हे तमाशा कलेतील जाणकार व्यक्तिमत्व आहे, अनुभवी व्यक्तीमत्व आहे.ते अतिशय तळमळीने बोलत होते.

पटलं तर…

माननीय बाळासाहेब विरळीकर यांच्या कार्यास लेख अर्पण….

राजेंद्र.डी.मोरे बारामती

fb img 1773887068819

Related posts

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड !!

Chief Editor

पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासा !!

Chief Editor

असे तमाशाफड,असे तमाशा व्यवस्थापक – मा.राजेंद्र छगन काशीद

Chief Editor

Leave a Comment