सामाजिक

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांना एक्साईड इंडस्ट्रीजची सुवर्णसंधी;फिटर व इलेक्ट्रिशियन विभागातील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमधून दमदार निवड !!

1009571130

पंचनामा प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याला उद्योगविश्वाची भक्कम दाद मिळाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी कॅम्पस ड्राईव्हमध्ये यशाची उज्ज्वल पताका फडकावली आहे. पिंपरी-चिंचवड येथील नामांकित कंपनी एक्साईड इंडस्ट्रीज प्रा.लिमिटेड यांच्या वतीने आयोजित मुलाखत प्रक्रियेत फिटर व इलेक्ट्रिशियन विभागातील तब्बल सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत आयोजित “कॅम्पस ड्राईव्ह २०२६” ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, प्रभावी संवादकौशल्य, सॉफ्ट स्किल्स तसेच कलचाचणीच्या आधारे निवड प्रक्रिया पार पडल्याची माहिती कंपनीचे एचआर रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह अहमद सय्यद यांनी दिली.

यामध्ये फिटर विभागातून ओंकार घोलप व चैतन्य पवार, तर इलेक्ट्रिशियन विभागातून हर्षल ढवळे, सुमेध गवांदे, सिद्धेश डेरे आणि गणेश माने यांनी यश संपादन करत नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळवली.

या यशस्वी प्लेसमेंट मोहिमेसाठी उपप्राचार्य विष्णू मापारी,विलास सोनवणे,विकास कणसे आणि निकेश औटी यांनी विशेष परिश्रम घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला.

“ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्याची जोड आणि उद्योगविश्वाची साथ मिळाल्यास यशाची शिखरे सहज गाठता येतात,” हेच या निवडीमधून अधोरेखित झाल्याची भावना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी व्यक्त केली.

fb img 1774661444136

Related posts

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसरा हप्ता जारी ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत !!

Chief Editor

शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे : प्रा.मोबीन तांबोळी

Chief Editor

निधन वार्ता – इंदूरी गावचे मा. सरपंच किसनराव नागुजी देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन

Chief Editor

Leave a Comment