सामाजिक

निधन वार्ता – इंदूरी गावचे मा. सरपंच किसनराव नागुजी देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन

img 20260430 wa0498


इंदुरी गावचे माजी सरपंच किसनराव नागुजी देशमुख यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी वय 92 वर्ष होते.
किसनराव देशमुख यांनी गावच्या सरपंच पदासह दूध संस्थेचे चेअरमन पदही भूषवले होते. ते बस्तीराम सारडा यांच्या उंट बिडी उद्योग समूहाचे मॅनेजर होते. त्यांनी इंदुरी येथील सती तारामतीमातेचे मंदिर उभारणी केली आहे.
त्यांचे पश्चात पत्नी, मुले अगस्ती विद्यालयाचे निवृत्त शिक्षक शांताराम देशमुख सर, इंदोरीचे माजी उपसरपंच सुभाष देशमुख, माजी प्राचार्य रमेश देशमुख तर नातू जलसंपदा अभियंता अक्षय देशमुख, सचिन कृषी सेवा केंद्राचे संचालक सचिन देशमुख, इंजि. आकाश देशमुख हे आहेत.
इंदुरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

img 20260430 wa0498

Related posts

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ;पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Chief Editor

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक स्वप्नांना शिक्षकांनी दिली भरारी ; आंबेगाव-शिरूर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान !!

Chief Editor

Leave a Comment