सामाजिक

यंदाची आषाढीवारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित व आरोग्यदायी होणार; अत्यावश्यक वेळी रुग्णांना मिळणार एअर ॲम्ब्युलन्स सुविधा !!

1010071369
1010071369

पंचनामा प्रतिनिधी – यंदाची आषाढीवारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रथमच अत्यावश्यक वेळी रुग्णांना उच्चस्तरीय उपचार मिळावेत एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. यासोबतच सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स, आपत्कालीन वैद्यकीय पथके आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून लाखो वारकरी भाविकांना तातडीची उपचार सेवा देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.

1010070996

गंभीर रुग्णांना तातडीने विशेष रुग्णालयात हलविण्यासाठी #एअरॲम्बुलन्स ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय, गर्दीच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी बाईक ॲम्बुलन्स, आधुनिक जीवनरक्षक उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सतत कार्यरत राहणार आहेत.

आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी बैठकीच्याप्रारंभी वारीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या व्यापक नियोजनाची माहिती सादर केली. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, तात्पुरती वैद्यकीय पथके, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था तसेच मनुष्यबळाची उपलब्धता याबाबतची माहिती दिली.

Related posts

युवा ताशावादक जालिंदर शेवाळे यांना आंबेगाव भूषण पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथे पाण्याचा टँकर सुरू !!

Chief Editor

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!

Chief Editor

Leave a Comment