सामाजिक

१९६८/६९बॅचचे माजी विद्यार्थी सत्तावन्न वर्षानी भेटले एकत्र !!

1010072616
1010072623

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

शिंगवे (ता. आंबेगाव) येथील जिवन शिक्षण मंदिर शिंगवे विद्यालयातील इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा, जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे विद्यालयात झाला. ५७ वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

चौथी ते सातवीच्या विद्यालयातील ३२ विद्यार्थींनपैकी २०विद्यार्थी एकत्र येऊन हा मेळावा पार पडला. सर्व विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी सर्वांनी आपला परिचय करून देताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आनंद मेळाव्यासाठी पुणे, मुंबई, नगर, सोलापूर या ठिकाणावरून विद्यार्थी आले होते.

1010072619

मारूती वाव्हळ यांनी जिल्हा परिषद शाळेत सर्व विद्यार्थ्यांनची नाव, मोबाईल नंबर मिळवून व्हाट्सअप ग्रुप तयार करून तसेच माजी विद्यार्थ्यांनशी संपर्क साधून आनंद मेळाव्यासाठी पुढाकार घेतला व विद्यार्थी सर्व मित्र-मैत्रिणींना संपर्क साधून माजी विद्यार्थ्यांच्या आनंद मेळाव्यासाठी पुढाकार घेतला. तसेच सुदाम गाढवे, रामदास मेहेत्रे, बंडू पडघमकर, हनुमंत वाव्हळ यांनी मदत केली..

कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी शिक्षकांनी मार्गदर्शन केले..

यावेळी सूत्रसंचालन कादरभाई पटेल यांनी तर आभार मारूती वाव्हळ यांनी मानले.

1009850407
1010073642
1010074354

Related posts

राज्यात ३-४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा;अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार !!

Chief Editor

समर्थ गुरुकुलमध्ये ‘समर्थ बालमहोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील लोणी- रानमाळा रस्त्यावर तरुणांवर बिबट्याचा हल्ला !!!

Chief Editor

Leave a Comment