सामाजिक

समर्थ लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ उत्साहात संपन्न ; वकिलांनी व्यावसायिक नीतिमूल्यांचे पालन करावे– ॲड.अहमदखान पठाण

1011572567

पंचनामा प्रतिनिधी – वकिली हा केवळ व्यवसाय नसून समाजाला न्याय मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक वकिलाने व्यावसायिक नीतिमूल्यांचे पालन करून न्यायदान प्रक्रियेत सहकार्य करावे. व्यावसायिक मूल्यांची जपणूक न करणाऱ्या वकिलांवर बार कौन्सिलला ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अहमदखान पठाण यांनी केले.

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज, बेल्हे (बांगरवाडी), ता. जुन्नर येथे प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत  समारंभानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. पठाण यांनी आपल्या वकिली क्षेत्रातील अनुभव आणि जीवनातील विविध प्रसंग सांगून व्यावसायिक नीतिमूल्यांचे महत्त्व विशद केले. त्यांच्या आजोबांनी दिलेला ‘वकील हो, पण कोणाचे वाईट करू नको’ हा सल्ला आपल्या संपूर्ण वकिली जीवनात कसा मार्गदर्शक ठरला, याबाबत त्यांनी अनुभव कथन केले. पुण्यासारख्या शहरात कायद्याचे वर्ग घेऊन आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक न्यायाधीश आणि कुशल वकील घडविण्यात योगदान दिल्याचेही त्यांनी सांगितले.

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी संस्थेने घेतलेले परिश्रम आणि त्यासाठी केलेली धडपड आपण जवळून पाहिली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालकांची असलेली तळमळ निश्चितच कौतुकास्पद आहे.

यावेळी महाविद्यालयात आयोजित एल.एल.बी. आणि बी.ए. एल.एल.बी. अभ्यासक्रमांच्या वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. एल.एल.बी. वक्तृत्व स्पर्धेत मयूर पाचपुते यांनी प्रथम, संदीप कणसे यांनी द्वितीय, तर सचिन मुंढे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.     एल.एल.बी. प्रश्नमंजुषा स्पर्धेत रेश्मा वाघोले प्रथम, नरोत्तमसिंघ राजवत द्वितीय, तर वैभव पुंड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

बी.ए. एल.एल.बी. वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी स्वामी यांनी प्रथम, भाग्यश्री भैय्ये यांनी द्वितीय, तर सुजित फुलमाळी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत अमृता मेंगडे यांनी प्रथम, अपूर्व जानराव व श्रावणी लोखंडे यांनी द्वितीय, तर वैष्णवी वाघ व समीक्षा भांडारकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

तसेच समर्थ युवा महोत्सवात एकपात्री अभिनय स्पर्धेत शिवानी राम, गायन स्पर्धेत अमोल गायकवाड यांनी तृतीय, तर वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी मोरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कवडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच ॲड. पठाण यांनी विद्यार्थ्यांसाठी एक पूर्ण दिवस राखीव ठेवून कायद्यातील विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. यास सकारात्मक प्रतिसाद देत महाविद्यालयाने निश्चित केलेल्या दिवशी मार्गदर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन ॲड. पठाण यांनी दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कवडे, श्री. शिवाजी कुमकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.

1011572567

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा.कल्याणी दरेकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.अविनाश कांबळे यांनी करून दिला, तर प्रा.अभिषेक सोनावणे यांनी आभार मानले.

1011523595
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 402642

Related posts

शासनाच्या वीज पुरवठा न देण्याच्या धोरणाविरुद्ध धामणीकरांचा एल्गार !!

Chief Editor

जीवन प्रवासात एकवेळ “पंगत” चुकली तर चालेल मात्र “संगत” चुकायला नको…!!

Chief Editor

कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने लोणी (ता.आंबेगाव) येथील ज्येष्ठ शेतिनिष्ठ शेतकरी गनिभाई हुसेन सय्यद सन्मानित!!

Chief Editor

Leave a Comment