सामाजिक

खात्यात पाच हजार जमा; पण पोस्टात पैसेच नाहीत ; दिवाळीच्या तोंडावर लोणीतील शेतकऱ्यांची गैरसोय; पैसे काढण्यासाठी हेलपाटे, शेतकऱ्यांमध्ये नाराजी !!

1011586788
1011586788

पंचनामा प्रतिनिधी लोणी (ता. आंबेगाव) : शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, खात्यात पैसे जमा झाल्याचा आनंद साजरा करण्याआधीच लोणी येथील पोस्ट कार्यालयात रोख रक्कम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन दिवाळीच्या सणातच पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून खात्यात पाच हजार रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे अनेक शेतकरी खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी लोणी पोस्ट कार्यालयात गेले. मात्र, कार्यालयात रोख रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा केली जात आहे, तर दुसरीकडे ती रक्कम काढण्यासाठी पोस्ट कार्यालयातच पैसे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. दिवाळीच्या सणासाठी खरेदी, घरखर्च आणि इतर आवश्यक कामांसाठी पैशांची गरज असतानाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खेड पोस्ट कार्यालयातही रोख रक्कम उपलब्ध नाही !

याबाबत लोणी येथील पोस्टमास्तर लोकेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, “खेड येथील पोस्ट कार्यालयातून रोख रक्कम आणण्यासाठी आलो होतो; मात्र खेड पोस्ट कार्यालयातही पैसे उपलब्ध नाहीत. खातेदारांना उद्या शुक्रवार, दि. ६ रोजी पैसे मिळतील.”

दरम्यान, लोणी पोस्ट कार्यालयात नियमितपणे पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी आणि शासनाकडून खात्यात जमा झालेली मदत शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related posts

आंबेगावातील पूर्व भागात पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला मकर संक्रांतीचा सण !!

Chief Editor

समाजभूषण कैलासराव गायकवाड यांना ‘पत्रकार भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार !!

Chief Editor

समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड !!

Chief Editor

Leave a Comment