सामाजिक

आंबेगावातील पूर्व भागात पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला मकर संक्रांतीचा सण !!

img 20260115 wa0153

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पारंपारिक पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. जारकरवाडी (ढोबळेवाडी) येथील निवृत्त फॉरेस्ट अधिकारी श्री.सोपानराव भाऊ ढोबळे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.यावेळी संगीत खुर्ची,उखाणे स्पर्धा आदी स्पर्धा संपन्न झाल्या.

भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात.

संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

fb img 1768108641525

यावेळी ढोबळे कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित महिला भगिनींना वान स्वरूपात भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. अनेक महिला भगिनींनी या कार्यक्रमात विविध गवळणी,अभंग, कविता सादर करीत मकर संक्रांतीच्या सणाचा आनंद लुटला. या सणांच्या माध्यमातून आपण आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे अशी अपेक्षा तेजस्विनी ॲग्रोटेकच्या सौ.ऋतुजा नितीन ढोबळे, डॉ. नीलिमा सचिन ढोबळे यांनी व्यक्त केली.

img 20260115 wa0157

Related posts

बदलत्या हवामानाचा होतोय आंब्याच्या मोहोरावर परिणाम; गावरान सह कलमी आंब्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज !!

Chief Editor

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांना एक्साईड इंडस्ट्रीजची सुवर्णसंधी;फिटर व इलेक्ट्रिशियन विभागातील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमधून दमदार निवड !!

Chief Editor

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शेतकऱ्यांची अभ्यास सहल संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment