सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत झाली डिजिटल !!

img 20260114 wa0304

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख निर्माण केलेले जवळे गाव नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये ग्रामपंचायत जवळे यांनी डिजिटल माहिती बोर्ड ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी लावण्यात आलेला आहे यातून ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती, ग्रामसभा,तसेच पंचायतीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती यावरती देण्यास मदत होईल असे जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी सांगितले.

img 20260114 wa0305

या बोर्डच्या उद्घाटन प्रसंगी गावांमधील बबन बोराटे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र वाळुंज, गुलाब गावडे, किसन अभंग,काळूराम शिंदे, विशाल गावडे, विलास लायगुडे, किसन लोखंडे,मारुती शिंदे, बबन लोखंडे,शामराव गावडे,ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे,शैला गावडे भूपेंद्र वाळुंज,अशोक लोखंडे यासह ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते अशी माहिती सरपंच वृषालीताई शिंदे पाटील यांनी दिली.

fb img 1768108641525

Related posts

अजामेळा दिंडीच्या वतीने पंढरपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव !!

Chief Editor

जारकरवाडी फाटा–लोणी (धामणी) रस्त्यालगतची झाडे-झुडपे अखेर हटवली; मात्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम !!

Chief Editor

श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment