सामाजिक

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध– राज्यमंत्री योगेश कदम

1010608598

पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा; उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

पंचनामा प्रतिनिधी – गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळास भेट देऊन उत्पादन विभाग, सर्पालय, अश्व संवर्धन विभाग तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

1010608599

हाफकिन संस्थेची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, अँटी-स्नेक व्हेनम सीरमचे उत्पादन वाढवावे तसेच राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार किट उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

हाफकिनच्या प्रलंबित निधीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करण्यात येईल. संस्थेच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री कदम यांनी यावेळी दिली.

हाफकिन संस्थेकडे असलेली क्षमता, प्रदीर्घ अनुभव आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा यांचा प्रभावी वापर करून संस्थेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

1010608597

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हुकरे, हाफकिनचे महाव्यवस्थापक धीवर, पिंपरी विभाग व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुरहे यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

1010457105

Related posts

नशामुक्त युवा, विकसित भारत’ संकल्प अभियान समर्थ शैक्षणिक संकुलात उत्साहात संपन्न !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला !!

Chief Editor

रानमळा (ता.आंबेगाव) येथे पिंजरा लावला; मात्र दरवाजा बंदच ; बिबट्याचा वावर कायम !!

Chief Editor

Leave a Comment