सामाजिक

शरद सहकारी बँकेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी विठ्ठल सिताराम ढोबळे यांचा सन्मान !!

img 20260304 wa0255

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे शरद सहकारी बँकेच्या वतीने सेवक प्रशिक्षण व स्नेह मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले.यावेळी बँकेच्या सर्व शाखांतील दैनंदिन ठेव प्रतिनिधींचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात आंबेगाव तालुक्यातील सर्वोत्कृष्ट दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून बँकेच्या पारगाव शाखेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी विठ्ठल सिताराम ढोबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी केले कौतुक यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,संचालक शिवाजीराव लोंढे,अजय घुले,दौलतराव लोखंडे, दत्ताशेठ थोरात,जयसिंग थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख,उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव तसेच सर्व विभागप्रमुख,शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

img 20260304 wa0255

विठ्ठल ढोबळे यांनी पारगाव शाखेत दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना बँकेच्या व्यवसाय वृद्धीत मोलाचा वाटा उचलला आहे. नियमित संपर्क,ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि प्रामाणिक सेवेमुळे त्यांनी शाखेच्या ठेवींमध्ये लक्षणीय वाढ साध्य केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आंबेगाव तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून गौरविण्यात आले.

विठ्ठल ढोबळे हे पारगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच म्हणूनही कार्यरत होते.सध्या ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामविकासाच्या कामात सक्रिय सहभाग घेत आहेत.सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

fb img 1771121534243

शरद सहकारी बँकेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी विठ्ठल सिताराम ढोबळे यांचा सन्मान करताना बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा.समवेत संचालक मंडळ.

223213b66f5342c28714ee71ce753a86

Related posts

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्री.पीरसाहेब-हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला संपन्न !!

Chief Editor

उष्णतेचा कहर कायम; पण आजपासून पावसाची शक्यता !!

Chief Editor

उन्हाळ्याची चाहूल लागताच माठांची मागणी वाढली; ‘गरीबांचा फ्रीज’ पुन्हा घराघरांत पोहचणार !!

Chief Editor

Leave a Comment