सामाजिक

पारगाव (शिंगवे ) गावात जपली जातेय वीर देवाची शेकडो वर्षांची परंपरा !!

img 20260303 wa0672
img 20260303 wa0669

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथे वीर देवाची शेकडो वर्षांची परंपरा जपली जाते आहे !!

होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुलिवंदन सणाच्या दिवशी लहान मुलांना पारंपरिक वेशभूषमध्ये सजावट करून ग्रामदैवत मुक्तादेवीसमोर आणले जाते, यावेळी ही लहान मुल गोलाकार फेर धरून नाचत असतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ढोलाच्या तालावर लेझीम असेल किंवा इतर पारंपरिक खेळ खेळत असतात,

img 20260303 wa0672(1)

वीरदेवाला घरी घेऊन देवाची तळी भंडार करुन या कार्यक्रमाची सांगता होते, त्यानंतर वीर देवांना घरी नेले जाते. गावातील व घरातील महिला भगिनी या लहानग्यांचीच वीरदेव म्हणून विधीवत पूजा करुन दर्शन घेत असतात.

काळाच्या ओघात अनेक गोष्टी लोप पावत चालत असल्या तरी जोपर्यंत अशा प्रथा, परंपरा टिकून आहेत तोच पर्यंत खऱ्या अर्थाने गावाला गावपण टिकून असल्याचे ग्रामस्थांनी पंचनामशी बोलताना सांगितले.

img 20260303 wa0671

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंगशेठ देवडे,शंकर देवडे,गोकुळ देवडे,भरत कोल्हे,विकास देवडे,किरण कोल्हे,पांडुरंग देवडे,विकास देवडे,ज्ञानेश्वर कोल्हे, महादेव देवडे,निवती देवडे,योगेश कोल्हे, सुधाकर कोल्हे,करण देवडे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

fb img 1771121541695
223213b66f5342c28714ee71ce753a86

Related posts

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांना एक्साईड इंडस्ट्रीजची सुवर्णसंधी;फिटर व इलेक्ट्रिशियन विभागातील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमधून दमदार निवड !!

Chief Editor

आदर्शगाव गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात !!

Chief Editor

राजुरी मध्ये ६७६ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी ;२८९ रुग्णांना मोफत चष्मे वाटप तर १३९ रुग्णांची होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया !!

Chief Editor

Leave a Comment