सामाजिक

ज्ञान-विज्ञानासोबत अध्यात्माची जोपासना हीच उज्ज्वल भारताची पायाभरणी – माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके

1010324487

“संस्कार, संस्कृती आणि शिक्षणाचा त्रिवेणी संगम म्हणजे समर्थ गुरुकुल”

1010324487


पंचनामा प्रतिनिधी- “वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आत्मा आहे. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि संस्कार यांची जोपासना झाली, तरच राष्ट्राभिमानी, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार पिढी घडेल,” असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांनी केले.

समर्थ रुरल एज्युकेशनल ¡इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे (बांगरवाडी) येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य बालदिंडी सोहळा भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा अविस्मरणीय सोहळा ठरला. टाळ-मृदुंगाच्या निनादात, विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि भगव्या पताकांच्या डौलदार लयीत संपूर्ण समर्थ संकुल जणू साक्षात पंढरीत रूपांतरित झाले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका सारिकाताई शेळके आणि माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांच्या शुभहस्ते दिंडी पूजनाने झाले. यावेळी संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारकरी वेशभूषेतील चिमुकल्यांनी संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांची साकारलेली रूपे उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून गेली. विठुरायाचे सावळे, सुंदर रूप आणि रुक्मिणी मातेचे तेजस्वी दर्शन पाहून प्रत्येकाच्या मनात भक्तीचा सागर उसळला.

समर्थ गुरुकुलमधून निघालेल्या या दिंडीचे इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ कॉलेज, हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, आयटीआय, समर्थ पॉलिटेक्निक, एमबीए, बीसीएस, ज्युनिअर कॉलेज तसेच संकुलातील सर्व विभागांनी पुष्पवृष्टी, औक्षण आणि पूजन करून उत्स्फूर्त स्वागत केले. “विठ्ठल… विठ्ठल…”, “माऊली… माऊली…” या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

1010324485

“येई हो विठ्ठले”, “माझी पंढरीची माय” यांसारख्या अभंगांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, रिंगण, फुगडी, लेझीम, पावली आणि पारंपरिक वारकरी खेळांनी उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला. प्रत्येक सादरीकरणातून भारतीय संस्कृतीचे जतन आणि वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडले.

आळंदी देवाची येथील विद्यार्थ्यांनी ह.भ.प.अनंत महाराज जोगदंड यांनी हरिपाठ, पावली आणि भजन सादर करून व आषाढी एकादशीचे महत्व विशद करून समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे केलेले जतन आणि सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.
ज्ञान, संस्कार आणि भक्तीचा अविस्मरणीय संगम

समर्थ गुरुकुलमध्ये पार पडलेला हा बालदिंडी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर भारतीय संस्कृतीचे जतन, वारकरी परंपरेचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला. उपस्थित प्रत्येकाच्या मनावर या भक्तिमय सोहळ्याने कायमस्वरूपी संस्कारांची अमिट छाप उमटवली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, मीराताई शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, संचालिका सारिकाताई शेळके, प्राचार्या वैशालीताई आहेर,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण बालदिंडी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन प्राचार्य सतीश कुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे व सखाराम मातेले यांच्या नियोजनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाडेकर,प्रास्ताविक दिपाली नवले यांनी तर प्रीती जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाली स्वच्छता मोहीम!!

Chief Editor

रांजणी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; ८० वर्षापासून नाट्य परंपरा जपणाऱ्या समाज विकास नाट्य मंडळाला नाट्य गौरव सन्मान-२०२६ पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले गुरूचरित्र पारायण, गृह पठण !!

Chief Editor

Leave a Comment