सामाजिक

धामणी येथे वैरण विकास योजनेअंतर्गत मका वाटप !!

1010413030


धामणी, ता. आंबेगाव : पशुसंवर्धन विभागाच्या वैरण विकास योजनेअंतर्गत आज (दि. १ ऑगस्ट २०२६) पशुवैद्यकीय दवाखाना, धामणी येथे पशुपालकांना मका बियाण्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी पांडे सर यांच्या उपस्थितीत लाभार्थी पशुपालकांना मका बियाण्याचे वितरण करण्यात आले. तसेच TVS कंपनीच्या संगीता वाळुंज व पशुसखी भावना सिनलकर याही या कार्यक्रमास उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी पशुपालकांना वैरण विकास योजनेचा लाभ घेऊन दर्जेदार हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे पशुपालकांना चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, शासनाच्या वैरण विकास योजनेचा लाभ अधिकाधिक पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

1010391286

Related posts

हा रस्ता धुक्यात नव्हे तर धुळीत हरवला !!

Chief Editor

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्ही.आय.पी – पालकमंत्री जयकुमार गोरे

Chief Editor

शिंगवे (पारगाव) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद; जनआक्रोश मोर्चा

Chief Editor

Leave a Comment