सामाजिक

वारली कलेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन; समर्थ गुरुकुलमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात

1010528508
1010528508


पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे मध्ये जागतिक आदिवासी दिन विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, जीवनशैली व कलावैभवाची ओळख व्हावी, या उद्देशाने विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी आदिवासी समाजाच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. या नाटिकेतून आदिवासी समाजाची जीवनपद्धती, निसर्गाशी असलेले नाते, परंपरा आणि सामाजिक जीवनाचे प्रभावी चित्रण करण्यात आले. विद्यार्थिनींच्या अभिनयाने उपस्थितांची दाद मिळवली.
इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी वारली चित्रकलेचे आकर्षक चित्रण करून आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू कागदावर साकारले. निसर्ग, शेती, सण-समारंभ, सामूहिक जीवन आणि आदिवासी परंपरा यांचे दर्शन घडविणाऱ्या चित्रांनी गुरुकुल परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमासाठी प्राचार्य सतीश कु-हे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे सर यांनी केले.वैशाली सहाणे,शीतल पाडेकर ,दीपाली नवले , चित्रकला शिक्षिका दीप्ती चव्हाण आणि स्नेहल ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहलताई शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांच्या सादरीकरणाचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना आपल्या देशातील विविध संस्कृती व परंपरांची ओळख करून देत त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक संवेदनशीलता निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

1010457105
1010480394
1010516783

Related posts

जलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आवाहन !!

Chief Editor

निरंकारी इंग्लिश मीडियम संत समागमात प्रेम, शांती आणि एकत्वाचा संदेश !!

Chief Editor

मंचर येथे अनुसया महिला उन्नती केंद्राच्या लोकसेवेचा गौरव; तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांच्या हस्ते सन्मान !!

Chief Editor

Leave a Comment