सामाजिक

ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे भरवस्तीत बिबट्याचा कालवडीवर हल्ला !!

1010320159

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वर्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री.बाळासाहेब धनु पाचपुते यांच्या भरवस्तीत असणाऱ्या गोठ्यातील कालवडीवर पहाटे 4.30 वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कालवड जबर जखमी झाली आहे.

1010320275

गेले काही दिवस जारकरवाडी परिसरात बिबट्याचे हल्ले थांबले होते. प्रामुख्याने ऊस तोड झाल्याने आश्रयस्थान कमी झाले होते त्यामुळे बिबट्याचे प्रस्थ कमी झाले होते.मात्र आज भर वस्तीत असणाऱ्या गोठ्यात बिबट्याने शिरकाव करून कालवडीवर हल्ला केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने या परिसरात ताबडतोब पिंजरा लावावा अशी मागणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, मा.उपसभापती श्री. रामचंद्र ढोबळे, उपसरपंच सचिन टाव्हरे, माजी उपसरपंच बाळासाहेब ढोबळे, संचालक दादाभाऊ टाव्हरे, भीमाशंकर ढोबळे, प्रदीप ढोबळे, विलास ढोबळे, विलास पाचपुते, नितीन ढोबळे यांनी केली आहे.

1009850407

Related posts

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता ; मृत गाय आणि मेलेल्या कोंबड्यांची तत्काळ लावली विल्हेवाट !!

Chief Editor

मंचर (ता.आंबेगाव) एस.टी.बस स्थानकाचा होणार कायापालट; ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी;मा.मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !!

Chief Editor

Leave a Comment