
पंचनामा प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने “तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय युवक–युवती उन्नयन : ताणतणाव व्यवस्थापन व व्यसनमुक्ती” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेतील १०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार डॉ. लक्ष्मण घोलप,डॉ.शरद पारखे तसेच विविध विभागातील प्राचार्य उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना ताणतणाव,मानसिक दबाव व व्यसनांच्या आकर्षणाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगून अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यामध्ये जी.एम.आर.टी.खोडदचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन शेरकर यांनी ताणतणावाची कारणे याविषयावर मार्गदर्शन केले.

कामाचा ताण,कौटुंबिक समस्या,आर्थिक अडचणी,झोपेचा अभाव,चिडचिड,रक्तदाब वाढणे यांसारख्या ताणतणावाच्या लक्षणांची माहिती देत त्यांनी (Avoid, Alter, Accept,Adopt) च्या माध्यमातून ताणतणाव कसा नियंत्रित करता येतो हे स्पष्ट केले.त्यानंतर डॉ.अरुण गुळवे यांनी योग,प्राणायाम,मेडिटेशन तसेच नियमित व्यायामाचे शारीरिक व मानसिक फायदे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितले.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी केंद्राचे संचालक मनोज हाडवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृषी पर्यटनाची संकल्पना,शेतीशी निगडित उपक्रम,निसर्गाच्या सान्निध्यातून मिळणारी मानसिक शांतता तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी निसर्गोपचाराचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.

ताणतणाव व व्यसनमुक्ती कार्यशाळेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी सुमन व्यसनमुक्ती केंद्र आळेफाटा,केंद्राला भेट दिली.या भेटीदरम्यान केंद्राचे मार्गदर्शक डॉ.निखिल कणसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मार्गदर्शनात त्यांनी व्यसनांचे प्रकार,त्याचे शारीरिक,मानसिक व सामाजिक दुष्परिणाम, संगत व उद्दिष्टपूर्ण जीवनशैलीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
गीत गायनातून ताणतणाव मुक्ती हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. डॉ.जयसिंग गाडेकर व संदीप वाघोले यांनी या उपक्रमात समूहगीत गायन,भावगीत व प्रेरणादायी गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनःशांती व मानसिक आनंदाचा अनुभव देण्यात आला.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गीतांच्या तालावर आपले विचार,भावना व तणाव विसरून आनंद व्यक्त केला.
वेळ आणि आर्थिक व्यवस्थापन विषयावर कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी वेळेचे योग्य नियोजन केल्यास ताणतणाव आपोआप कमी होतो,असे सांगितले.
शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्य या महत्त्वपूर्ण विषयावर दिलीप कचेरे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,जुन्नर) यांनी आपल्या मार्गदर्शनात निरोगी शरीर आणि सुदृढ मन हे यशस्वी जीवनाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले.
मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण या विषयावर मुबीन तांबोळी यांनी मनातील भावना दडपून न ठेवता त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणे मानसिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे,हे स्पष्ट केले.भावना व्यक्त न झाल्यास ताणतणाव,चिडचिड,नैराश्य यांसारख्या समस्या निर्माण होतात.
समारोप समारंभ प्रसंगी खासदार डॉ.अमोल कोल्हे व मा.आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे उपस्थित होते.

कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.कल्याणी शेलार,प्रा.अक्षय वाघ,प्रा.भूषण दिघे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.गणेश बोरचटे यांनी सर्वांचे आभार मानले.
