
पंचनामा प्रतिनिधी – इयत्ता पहिलीच्या वर्गातील अतिशय हुशार, चुणचुणीत आणि प्रत्येक शालेय उपक्रमात उत्साहाने व आवडीने सहभागी होणारी गुणी विद्यार्थिनी असावरी साईनाथ गायकवाड हिचा वाढदिवस वर्गात आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून असावरीच्या पालकांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी A4 आकाराच्या कागदांची रिम भेट म्हणून दिली. तसेच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, बिस्किटे आणि चॉकलेट यांचे वाटप करण्यात आले.

वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता वर्गमित्रांसोबत शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटून साजरा करण्याचा असावरीच्या पालकांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
असावरीला वाढदिवसानिमित्त निरोगी, आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची भेट देणाऱ्या तिच्या पालकांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


