सामाजिक

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे सोमवार दि.२० एप्रिल २०२६ ते बुधवार दि.२२ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार जय हनुमान यात्रा उत्सव !!

img 20260417 wa0633
img 20260417 wa0632

पंचनामा प्रतिनिधी – मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील जय हनुमान यात्रा उत्सव सोमवार (दि:२०) ते बुधवार (दि:२२) असे तीन दिवस संपन्न होणार आहे.

सोमवार ( दि :२०) रोजी सायंकाळी देवास शेरणी व दंडवताचा कार्यक्रम होईल व मंगळवार (दि.२१) व बुधवार (दि.२२) सकाळी ०९ ते सायंकाळी ०६ वाजता बैलगाड्यांच्या भव्य जंगी शर्यती होणार आहे. त्यासाठी बैलगाड्यांसाठी एकूण इनाम ४,५१,०००/- रुपये असून, प्रथम क्रमांकासाठी १०००००-/ रुपये, द्वित्तीय क्रमाक-७५०००/ रुपये, तृत्तीय क्रमाक-५१०००/ रुपये, चतूर्थ क्रमाक-३१०००/ रुपये, इनाम असून फायनलसाठी प्रथम क्रमांक-३१,००१/ रुपये,द्वित्तीय क्रमाक-२१००१/ रुपये,तृतीय क्रमांक-११,१११/ रुपये, चतुर्थ क्रमांक-९००१/ रुपये घाटाचा राजा यासाठी १११११/ वीस फूटावर कांडे-५,५५५/ रुपये, आकर्षक बारी-११११/ रुपये तसेच बैलगाडयांसाठी टोकन रविवार (दि.१९) रोजी सकाळी ०९ ते १२ वाजता लकी ड्रॉ पद्धतीने होईल. टोकन फी १०००/ रुपये राहील व गाडा जुंपत्यावेळी ५००/ रुपये परत केले जातील.

मंगळवार (दि.२१) रोजी रात्री नऊ वाजता नृत्यांगणा लावनी सम्राज्ञी मयुरी उत्तेकर चा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समस्त ग्रामस्थ मांदळेवाडी,मुंबई,पुणे व यात्रा कमेटी यांनी केले आहे असे ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

fb img 1774661444136

Related posts

जवळे येथे टी. बी. मुक्त भारत अभियाना अंतर्गत नागरिकांची तपासणी !!

Chief Editor

समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर्स डे प्रेरणादायी वातावरणात साजरा; सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव !!

Chief Editor

औषधांच्या किमतीत मोठी घसरण,बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिसच्या रुग्णांना मोठा दिलासा; ३९ औषधे होणार स्वस्त !!

Chief Editor

Leave a Comment