सामाजिक

आंबेगावच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने गणरायाचे आगमन !!

1010944568

ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धूम; धार्मिक उपक्रमांसह विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावागावांत गणरायाचे पारंपरिक पद्धतीने उत्साहात आगमन झाले असून, सार्वजनिक गणेशोत्सवामुळे संपूर्ण ग्रामीण भागात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

1010944569

गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच सामाजिक व धार्मिक संदेश देणारे देखावे उभारले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत गणपती अथर्वशीर्ष पठण, आरती, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांपासून महिला, युवक आणि बालगोपाळांचा उत्सवातील सहभाग वाढला आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला, निबंध लेखन, रांगोळी, हस्ताक्षर, प्रश्नमंजुषा तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

1010944566

ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, संस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीतील कलागुणांना प्रोत्साहन देणारा उपक्रम ठरत आहे. गावातील युवक मंडळे, महिला मंडळे, ग्रामस्थ तसेच शाळा यांचा उत्सवातील सहभाग लक्षणीय आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘एक गाव, एक उत्सव, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धन’ हा संदेश देण्याचा प्रयत्न विविध मंडळांकडून केला जात असून, पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक सामाजिक जाणीवा यांचा सुंदर संगम ग्रामीण भागातील गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.

1010944563
1010908108

Related posts

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार

Chief Editor

आणि…पाचपुते कुटुंबाचे क्षणात होत्याचे नव्हते झाले;जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे पावसाचा हाहाकार; अवघ्या काही मिनिटांत कोसळला ढगफुटी सदृश पाऊस !!

Chief Editor

अवसरी खुर्द येथील राजगुरू कुटुंबाने काठीची पायी चालवत नेण्याची परंपरा आजही कायम ठेवली!!

Chief Editor

Leave a Comment