
पंचनामा प्रतिनिधी – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना तसेच समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बांगरवाडी-बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ समर्थ क्रीडा संकुल, बेल्हे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
या स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील सुमारे ४० शाळांमधील १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तसेच सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत क्रीडाक्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध केली.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके आणि संपत स्पोर्टचे संपत शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करावी, असे आवाहन केले.
स्पर्धेतील विविध वयोगटांतील विजेते संघ पुढीलप्रमाणे :
१४ वर्षे मुले :
प्रथम क्रमांक – विद्या विकास मंदिर, राजुरी.
द्वितीय क्रमांक – ब्लूमिंगडेल इंग्लिश मीडियम स्कूल, १४ नंबर.
तृतीय क्रमांक – समर्थ गुरुकुल बेल्हे.
१७ वर्षे मुले :
प्रथम क्रमांक – ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल १४ नंबर.
द्वितीय क्रमांक – ज्ञानमंदिर हायस्कूल, आळे.
तृतीय क्रमांक – विद्या विकास मंदिर,राजुरी.
१९ वर्षे मुले :
प्रथम क्रमांक – गुरुवर्य रा. प. सबनीस ज्युनिअर कॉलेज नारायणगाव.
द्वितीय क्रमांक – समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे.
तृतीय क्रमांक – ज्ञानमंदिर ज्युनिअर कॉलेज,आळे.
१७ वर्षे मुली :
प्रथम क्रमांक – ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल, १४ नंबर.
द्वितीय क्रमांक – रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा.
तृतीय क्रमांक – जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल, आळेफाटा.
१९ वर्षे मुली :
प्रथम क्रमांक – रामकृष्ण मोरे हायस्कूल, निवृत्तीनगर.
द्वितीय क्रमांक – कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल, येडगाव.
तृतीय क्रमांक – समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे.
विजेत्या संघांना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी आणि आश्विनी जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच सहभागी सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडूंनी दिलेल्या सहकार्यामुळे स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांच्या वतीने सर्व आयोजक, क्रीडा शिक्षक, सहभागी शाळा व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले तसेच सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा देण्यात आल्या.




