सामाजिक

वडगावपीर येथे १०० शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; दुष्काळी परिस्थितीत चारा उत्पादनाला प्रोत्साहन; १०० टक्के अनुदानावर बियाणे वितरण !!

img 20261104 wa0730

पंचनामा प्रतिनिधी लोणी- : जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती आंबेगाव यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या सर्वसाधारण योजनेतून चारा उत्पादन वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील लोणी, खडकवाडी, वडगावपीर आणि मांदळेवाडी या गावांतील एकूण १०० शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

दुष्काळजन्य परिस्थितीत जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता व्हावी, तसेच शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पाच किलो याप्रमाणे एकूण ५०० किलो मका बियाण्यांचे १०० टक्के अनुदानावर वितरण करण्यात आले.

पशुपालकांनी या बियाण्यांची त्वरित पेरणी करून जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध करावा आणि चारा उत्पादन वाढवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बियाणे वाटप कार्यक्रमाचे वितरण पंचायत समिती सदस्या अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रेरणा मुळूक, बबन पानसरे, पशुसखी सोनाली खंडागळे, ज्योती वाळुंज, अर्चना रणपिसे, प्रियांका आदक, टीव्हीएस कंपनीचे डॉ.राक्षे,टीव्हीएस कंपनीच्या संगीता वाळुंज,पुष्पा लंके यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील पशुपालकांना चारा उत्पादनासाठी मदत मिळत असल्याने या उपक्रमाचे शेतकरी व ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 402642

Related posts

५१ फुटी श्रीरामरायाच्या भव्य मूर्ती उभारणीचा संकल्प ; पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीतून रामकार्याला हातभार !!

Chief Editor

असे तमाशाफड,असे तमाशा व्यवस्थापक – मा.राजेंद्र छगन काशीद

Chief Editor

राजुरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्यंगिरा चंडीपाठाचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment