सामाजिक

जांभोरी-पिंपरावणे येथे ३० लाखांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात संपन्न !!

1011564789
1011568046

आदिवासी सुधार योजनेअंतर्गत ५०० मीटर रस्त्याला निधी मंजूर ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

पंचनामा प्रतिनिधी : जांभोरी-पिंपरावणे येथे सुनिल रामभाऊ केंगले यांच्या घरापासून रविंद्र लक्ष्मण केंगले यांच्या घरापर्यंतच्या ५०० मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे ३० लाख रुपये निधीतून भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

महाराष्ट्र राज्याचे मा.गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील, मा.खा.म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील , महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार,टक्कर बाप्पा यांच्या माध्यमातून आदिवासी सुधार योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

1011568045

या रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेचे युवानेते मारुतीदादा केंगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सैनिक मुरलीधर केंगले, युवा कार्यकर्ते गणेश केंगले, सुरेश केंगले, प्रकाश केंगले, रविंद्र केंगले, अरुण केंगले, लक्ष्मण केंगले, योगेश केंगले, स्वप्नील खालकर उपस्थित होते.

तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या शिलाताई लोहकरे, पंचायत समिती आंबेगाव सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योतीताई पारधी, पंचायत समिती सदस्य संजय गवारी, प्रकाश घोलप, इंदुबाई लोहकरे, आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरमारे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शामराव बांबळे, जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदा पारधी, उपसरपंच बबन केंगले, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, क्षितिज रोकडे रावसाहेब, गायकवाड मेजर तसेच ठेकेदार स्वप्नील खालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

1011568040
1011564789

या रस्त्याच्या कामासाठी सर्व संबंधित मान्यवरांचे व स्थानिक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यानंतर जांभोरी-पिंपरावणे परिसरातील नागरिकांची दळणवळणाची सोय अधिक सुलभ होणार असून, ग्रामस्थांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त केले.

1011523595

Related posts

मान्सून अपडेट – महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी वाढणार ? हवामान विभागाचा मोठा अंदाज; ‘या’ तारखेनंतरच बरसणार धारा !!

Chief Editor

प्रेम, साधेपणा आणि एकत्वाचा संदेश देत संपन्न झाला निरंकारी सामूहिक साधा विवाह सोहळा ; १२६ नवयुगल जोडपी विवाहबंधनात…पुण्यासह महाराष्ट्रातील नवयुगलांचाही मंगलमय सामूहिक विवाह सोहळ्यात सहभाग…

Chief Editor

राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य; क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला शासनाचे पूर्ण सहकार्य-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Chief Editor

Leave a Comment