सामाजिक

भुगोल फाउंडेशनच्या वतीने खेडच्या पश्चिम दुर्गम भागात दिवाळी फराळ,नविन कपडे,शालेय साहित्य वाटप !!

1011560114
1011560130

पंचनामा प्रतिनिधी – भुगोल फाउंडेशन,एक हात मदतीचा,”माणुसकीचा दिप म्हणजे दिवाळी”*या उपक्रमा अंतर्गत रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वृक्षवेलीनी नटलेल्या निसर्गरम्य भागातील *वाघु, कोहिंडे खुर्द, वेताळे कातकरी वस्ती, गोलापूर* या दुर्गम भागात आदिवासी कातकरी गरीब गरजू लोकांना दिवाळी फराळ व कपडे, लहान मोठे सर्वांना नविन कपडे व शालेय साहित्य देण्यासाठी जाऊन हा उपक्रम राबविण्यात आला.

आपल्या वसुंधरेने आपणास अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. आपणही सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे , निसर्गाचे आपण काही तरी देणे लागतो म्हणुन सालाबादप्रमाणे याही वर्षी अध्यक्ष श्री विठ्ठल नाना वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली आपणआदिवासी,कातकरी ,गरीब व गरजू लोकांना दिवाळी फराळ व कपडे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

1011560126

या दुर्गम भागात जाऊन आपल्या भूगोल फाउंडेशन चे एक सहकारी संभाजीराव मिंडे यांच्या मार्गदर्शनाने गरीब गरजू अशा लोकांना स्थानिक ग्रामस्थांच्या समक्ष वंचित कुटुंबाना दिवाळी फराळ,पणत्या,स्रियांना साड्या, लहान मुलामुलींना कपडे, टी- शर्ट व शाळेतील मुलांना वह्या,फुटपट्टी व पेन,पेन्सिल, स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.भेटवस्तू घेतल्यानंतर त्यांना होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. ते खुश झालेले पाहून भूगोल फाउंडेशन च्या सदस्यांनाही आपण जे सत्कार्य करत आहोत त्यामुळे मनाला समाधान वाटत होते.

या कार्यासाठी विशेष म्हणजे मुंलीचे कपडे अत्यल्प दरात अभिजित पुरनाये यांनी दिले , हिरकणी हॉस्पिटलचे डॉ सोनाली व डॉ तांबे यांनी साडया व मुलींचे कपडे दिले तसेच भंडारी कलेक्शन यांनी सहा, नऊ वारी साड्या अत्यल्प दराने दिल्या,कीर्ती देसाई यांनी वह्या पेन पेन्सिल, विश्वास समुद्र काका यांनी कपडे व आर्थिक विशेष सहाकार्य देऊन सहकार्य केले त्यामुळे आमचा चांगल्या मदतीचा मार्ग अजुन सुखकर झाला. सुरुवातीला वाघू नंतर कोहिंडे खुर्द, वेताळे कातकरी वस्ती, गोलापूर गावातील आपल्या संस्थेच्या सर्वांचे स्वागत केले आणि नंतर भूगोल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री विठ्ठल नाना वाळुंज यांनी आपण करत असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रम व पर्यावरण, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गडकिल्ल्यांची साफसफाई, प्लॅस्टिक मुक्ती, नदी स्वच्छता,लोकप्रबोधन, जनजागरण इ. उपक्रमाची माहिती देऊन गावकर्यांनीही असे उपक्रम राबवावेत अशी सूचना केली.

1011556800

सकाळच्या गरमागरम नाष्टा ५० पेक्षा जास्त लोकांची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे श्रीकांत केटरर्सचे श्रीकांत मोरे यांनी केल्यामुळे दिवसभराचा काम करण्याचा मार्ग सुकर झाला. यावेळी भूगोल फाउंडेशन , संतनगर मित्र मंडळ,इंद्रायणी सेवा संघ,वटेशवर महिला भजनी मंडळ,तसेच संस्थेचे खालील सहकारी या उपक्रमात प्रत्यक्ष सामील झाले होते.

भूगोल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री विठ्ठल नाना वाळुंज, ॲड.संभाजीराव मिंडे ,इंद्रायणी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल वीर, बाळासाहेब कराळे, निकुंज रेंगे, मनोज माकोडे,ग्रामीण साहित्यिक लक्ष्मण वाळुंज, सुनील काटकर,सुनील बांगर, विशाल शेवाळे,यश समुद्र, हभप गुलचंद लोखंडे,जयवंत सावंत,विश्वनाथ टेमगिरे, संतोष दौंडकर,तानाजी भोसले, अभिजित भावसार, दीपक मानवाडकर,अतुल नढे, ऍड हर्षद नढे,प्रसाद शेरकर, निलेश जत, सुरेंद्र नागरे, ऍड अनुराग मिंडे,स्वराज बांगर, विराज बांगर भुगोल फाउंडेशन महिला आघाडीच्या शोभा फटांगडे, उद्योजक सुनिता बिरादार,ज्योती दरंदले,रोहिणी वाळुंज,रंजना नाणेकर, स्वाती समुद्र,सेजल वाळुंज,मिताली बसरगे, विद्या मिंडे, स्वाती वीर,सुनीता हुंबरे,अरुणा नागरे, रेणुका समुद्र असे अनेक जण सहभागी झाले होते या उपक्रमासाठी बऱ्याच दानशूर व्यक्तींनी मदत केली परंतु काहींना त्यांच्या पूर्वनियोजित कामामुळे प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही. त्यांच्या आर्थिक योगदानामुळे आपण १०० पेक्षा जास्त कुटुंबाना म्हणजे जवळपास ५०० पेक्षा जास्त लोकांना, मुलामुलींना ही दिवाळी भेट, नविन कपडे ,शालेय साहित्य देऊन खेडच्या पश्चिम भागातील परिसरात वृक्षवेलीनी नटलेल्या निसर्गरम्य भागातील लोकांची दिवाळी गोड केली.ग्रामस्थांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या कार्याची प्रशंसा करून भूगोल फाउंडेशन च्या सर्वांचे आभार मानले.

1011560108
1011560108
1011560114
1011560121
1011531960

Related posts

७९ व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना !!

Chief Editor

धामणी (लोणी) पहाददरा परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांना शेती उपसा सिंचन योजनेसाठी महावितरणकडून वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकरी करणार आमरण उपोषण !!

Chief Editor

जारकरवाडीच्या तरुणांनी जपली आषाढी बारशीच्या अन्नप्रसादाची अनोखी परंपरा !!

Chief Editor

Leave a Comment