
शिंगवे पारगाव (प्रतिनिधी – समीर गोरडे) – सैदापूर, कराड येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 35 किलो गटात रौप्यपदक मिळवणारा शिंगवे गावचा 9 वर्षीय पैलवान श्रीवर्धन तुषार गोरडे याची उज्जैन येथे होणाऱ्या ऑल इंडिया नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन महाराष्ट्र आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने अंडर 11 गटात हे यश मिळवले. अवघ्या नऊ वर्षांचा असून इयत्ता तिसरीत शिकणारा श्रीवर्धन हा आंबेगाव तालुक्याचा उगवता तारा ठरला आहे. तो सदावर्ते तालीम चास येथील माऊली वस्ताद दिपक भाऊ सदावर्ते यांचा पट्टशिष्य आहे.

त्याच्या राष्ट्रीय निवडीमुळे शिंगवे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय निवडीमुळे शिंगवे गावासह संपूर्ण आंबेगाव तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




