सामाजिक

मंचर–लोणी रस्त्यावर विनापरवाना डबल गतिरोधक ; वाहनचालक झालेत त्रस्त ; सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी नसल्याची माहिती ; गतिरोधक बसविले कोणी आणि कोणाच्या परवानगीने,नागरिकांचा सवाल ?

1011560383
1011560383

पंचनामा प्रतिनिधी – मंचर ते लोणी या रस्त्यावर निरगुडसर फाटा ते वैद्यवाडी फाटा दरम्यान डबल गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, या गतिरोधकांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, संबंधित गतिरोधक विनापरवाना बसविण्यात आल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावर एका खासगी कंपनीसमोर अचानक डबल गतिरोधक बसविण्यात आल्याने वाहनचालकांना वाहनांचा वेग कमी करताना कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या गतिरोधकांचा त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, संबंधित ठिकाणी गतिरोधक बसविण्यासाठी विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी नसताना हे गतिरोधक बसविले कोणी? ते कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या अधिकारात बसविण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी गतिरोधक आवश्यक आहेत, याबाबत दुमत नाही. मात्र, सार्वजनिक रस्त्यावर आपल्या सोयीनुसार कोणीही कुठेही गतिरोधक बसविणे योग्य आहे का? असा सवाल वाहनचालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित विनापरवाना गतिरोधकांची पाहणी करावी आणि नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून हे गतिरोधक त्वरित हटवावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

1011523595

Related posts

भीमाशंकर कारखान्याकडून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीची साखर !!

Chief Editor

जांभोरी गावठाणच्या विघ्नहर्त्याला उत्साहात निरोप !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला !!

Chief Editor

Leave a Comment