सामाजिक

जांभोरी गावठाणच्या विघ्नहर्त्याला उत्साहात निरोप !!

1011079562

भजने व विविध धार्मिक कार्यक्रमांनी ११ दिवस भक्तिमय वातावरण; ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषणांनी परिसर दणाणला

पंचनामा प्रतिनिधी जांभोरी – जांभोरी गावठाण येथील हनुमान तरुण मंडळ व महिला मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री विघ्नहर्ता गणपती बाप्पाची ११ दिवस भक्तिमय वातावरणात सेवा करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम, भजने व अन्य उपक्रमांनी गणेशोत्सवाची शोभा वाढविली. उत्सवाच्या सांगता दिनी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.

विसर्जन मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ, महिला मंडळाच्या सदस्यांसह लहान मुले व मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

1011079561

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुतीदादा केंगले, माजी सैनिक मुरलीधर केंगले, सुरेश केंगले, सुभाष केंगले, टल्लू केंगले, सागर काठे, हरिभाऊ केंगले, रामदास केंगले, गजानन काठे, संदीप केंगले, ग्रामपंचायत सदस्या लताबाई केंगले, माजी सरपंच सखुबाई केंगले, पेसा उपाध्यक्ष मीना केंगले, पुष्पा केंगले, लताबाई काठे, अंबाबाई केंगले, सूरज केंगले, दिलीप काठे, तुषार केंगले, रोहन केंगले, राजेंद्र उभे, शकुंतला उभे, संतोष केंगले, हनुमंत केंगले, रेणुका केंगले, रविंद्र केंगले यांच्यासह जांभोरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

११ दिवसांच्या गणेशोत्सव काळात विविध भजने व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्सवाची भक्तिमयता वाढविण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत गावातील महिला, पुरुष, युवक तसेच बालगोपाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुतीदादा केंगले यांनी दिली.

1011066539

Related posts

पशुवैद्यकीय अधिकार्यांचे विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन !!

Chief Editor

पारगाव (दत्तात्रयनगर) येथील गट क्रमांक ३५४ मध्ये भारतीय जनगणनेला सुरुवात !!

Chief Editor

आद्य संस्थापक दत्तात्रय वळसे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

Chief Editor

Leave a Comment