
पंचनामा पुणे – पुणे विभागाचे नवनियुक्त शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांची पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्राचार्य विक्रम काळे यांनी कदम यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन स्वागत व सत्कार केला.
या सदिच्छा भेटीदरम्यान पुणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षकांचे विविध सेवाविषयक प्रश्न तसेच प्रशासकीय कामकाजासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर योग्य समन्वय साधून ते मार्गी लावण्यासाठी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन कनिष्ठ महाविद्यालयांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाला गती मिळावी, या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस प्रा. हिम्मत तोबरे, उपाध्यक्ष प्रा. बब्रुवाहन घोडके, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र निकत, उपप्राचार्य गुंजाळ, प्रा. विक्रम चिगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे येथे शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करताना पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य विक्रम काळे व पदाधिकारी.




